परमबीर सिंग यांच्या या लेटरबॉम्बमध्ये कोणते महत्वाचे मुद्दे आहेत हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. भारताचा सच्चा नागरिक म्हणून मी मागील ३२ वर्षे पोलीस अधिकारी म्हणून शपथ घेतली आहे आणि त्या शपथेला जागलो आहे असे म्हणत मी नमूद केलेल्या मुद्द्यांची आपण दखल घ्यावी अशी विनंती त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना केली आहे.
क्लिक करा आणि वाचा-
परमबीर सिंग यांच्या पत्रात काय आहे?
>> मार्चच्या मध्यावर वर्षा बंगल्यावर परमबीर सिंग मुख्यमंत्र्यांना भेटायला गेल्याचा उल्लेख त्यांनी पत्रात केला आहे. तेथे परमबीर सिंग यांनी अँटिलिया स्फोटके प्रकरणाची सर्व माहिती मुख्यमंत्र्यांना दिल्याचे त्यांनी म्हटले आहे. त्यावेळी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या भ्रष्ट कारभाराबद्दलही आपण मुख्यमंत्र्यांच्या कानावर घातल्याचे सिंग यांनी लिहिले आहे.
>> इतकेच नाही तर उपमुख्यमंत्री अजित पवार आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनाही देशमुखांनी चुकीची माहिती दिल्याचे सिंग लिहितात. मात्र तिथे उपस्थित असलेल्या इतर मंत्र्यांना देशमुखांबाबत ही माहिती आधीच होती असे आपल्या लक्षात आल्यातेही ते लिहितात.
>> सचिन वाझे हे क्राईम इंटिलिजन्सचं यूनिटचे प्रमुख होतेत. गेल्या काही महिन्यात गृहमंत्री देशमुख यांनी अनेकदा वाझेंना त्यांच्या ज्ञानेश्वरी या निवासस्थानी बोलवले. तेथे त्यांनी त्यांना दर महिन्याला १०० कोटी रुपये जमा करण्यास सांगितले, असा गंभीर आरोप सिंग यांनी पत्रात केला आहे.
>> देशमुख यांनी वाझेंना फेब्रुवारीच्या मध्यावर ज्ञानेश्वरीवर बोलवून १०० कोटी रुपये गोळा करणयाची सूचना केली. त्यावेळी गृहमंत्र्यांचे खासगी सचिव पलांडे हे देखील हजर होते. तसेच घरातील काही कर्मचारीही उपस्थित होते.
>> यावेळी देशमुख यांनी सचिन वाझे यांना हे शंभर कोटी रुपये गोळा करण्यासाठी काय करायचे हेही सांगितले. मुंबईत १ हजार ७५० बार आणि रेस्टॉरंट्स आहेत. यांमधील प्रत्येकाकडून दोन ते तीन लाख रुपये गोळा केल्यास महिन्याला चाळीस ते पन्नास कोटी रुपये सहज उपलब्ध होतील, असे देशमुख म्हणाल्याचे सिंग लिहितात. उर्वरित रक्कम इतर ठिकाणांहून जमा करता येईल, असेही देशमुख म्हणाल्याचे सिंग यांनी लिहिले आहे.
>> त्यानंतर सचिन वाझे त्याच दिवशी माझ्या कार्यालयात गाठत देशमुखांनी केलेल्या मागणीबद्दल त्यांनी परमबीर सिंग यांना माहिती दिल्याचे सिंग लिहितात. हे ऐकून आपल्याला धक्का बसल्याचे ते लिहितात. ही परिस्थिती कशी हाताळता येईल या आपण विचार करत होतो,असेही त्यांनी लिहिले आहे.
>> गृहमंत्री अनिल देशमुख यांनी काही दिवंसापूर्वी समाज सेवा विभागाचे एसीपी संजय पाटील यांना आपल्या शासकीय निवास्थानी बोलवले आणि हुक्का पार्लर विषयी चर्चा केली. यावेळी इतर अधिकारी आणि गृहमंत्र्यांचे पीए पलांदे उपस्थित होते.
क्लिक करा आणि वाचा-
>> त्यानंतर दोनच दिवसांनी एसीपी संजय पाटील आणि डीसीपी भुजबळ यांना गृहमंत्र्यांच्या निवास्थानी बैठकीसाठी बोलवण्यात आले. पाटील आणि भुजबळ यांना अनिल देशमुख यांच्या घराबाहेर थांबा असे सांगण्यात आले. त्यावेळी पलांदे आत होते. पलांदे यांनी अनिल देशमुख यांच्या केबिनमधून बाहेर आल्यानंतर
>> मुंबईतील १ हजार ७५० बार आणि रेस्टॉरंट्समधून ४० ते ५० कोटी रुपये जमा होतील, असे पलांदे देशमुख यांच्या केबिनबाहेर येत म्हणाले. संजय पाटील यांनीच आपल्याला ही माहिती दिल्याचे सिंग यांनी लिहिले आहे.
>> गृहमंत्री देशमुख आपल्याला पूर्वकल्पना न देताच माझ्या अधिकाऱ्यांना त्यांच्या निवासस्थानी बोलवत असत, माझ्या अधिकाऱ्यांना वाट पाहायला लावत असत, त्यांचे पीएस पलांडे हे मध्यस्थी करत असत.
>> अनेक प्रकरणांमधील चौकशी आणि तपासात गृहमंत्र्याकडून राजकीय हस्तक्षेप झाला. या मुळे मुंबई पोलिसांना सर्वोच्च न्यायालय आणि हायकोर्टाकडून बदनामी झेलावी लागली.
क्लिक करा आणि वाचा-
>> मोहन डेलकर यांनी आत्महत्या मुंबईत केली असली तरी देखील त्यांना आत्महत्येसाठी प्रवृत्त करण्याच्या घटना दादरा-नगर हवेली इथ घडल्या. म्हणून त्यांना आत्महत्येसाठी प्रवृत्त केल्याची चौकशी दादरा, नगर हवेली पोलिसांनी करायला पाहिजे. कायदेशीर बाजू तपासल्यानंतर मी या मतावर आलो होतो. मात्र त्यावर अनिल देशमुखांनी मुंबईतच आत्महत्येसाठी प्रवृत्त झाल्याचा गुन्हा दाखल करायसाठी दबाव टाकला. डेलकर आत्महत्या प्रकरणात विधानसभेत एसआयटीची घोषणा केली, असे सिंग यांनी नमूद केले आहे.
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times