एकावर एक ट्विट करत सचिन सावंत यांनी भाजपवर टीकास्त्र सोडले आहे. ते आपल्या ट्विटमध्ये म्हणतात, ‘महाराष्ट्रातही विनोद राय प्रवृत्तीचे लोक प्रशासनात आहेत. सत्यपाल सिंह आघाडी सरकारला कळले नाही. जे पत्र दिसत आहे त्यामध्ये पश्चात बुध्दी दिसत आहे. जे संभाषण आज दाखवले जात आहे ते वर्षभरापूर्वीच झाले असते. अँटेलीया प्रकरण झाल्यानंतर कोणीही सामान्य बुद्धीचा व्यक्ती ही असे करणार नाही.’
काही अधिकारी दिल्लीच्या दबावात आहेत असे गृहमंत्र्यांनी महिनाभरापूर्वी सांगितले होते. केंद्रीय यंत्रणांच्या दबावाखाली अधिकाऱ्यांना आणून भाजपाने महाविकास आघाडी सरकारविरोधात अत्यंत कुटील षडयंत्र केलेलं दिसत आहे, असे सावंत यांनी म्हटले आहे. भाजपा नेत्यांना माहिती आधीच मिळते व ज्या सुसुत्रपणे ते प्रतिक्रिया लागलीच देतात त्यातून हे स्पष्ट होते. जी तत्परता अंबानी प्रकरणात केंद्राने दाखवली ती डेलकर प्रकरणात का दाखवली नाही? असा सवालही त्यांनी उपस्थित केला आहे.
क्लिक करा आणि वाचा-
डेलकर यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना पत्र लिहून आपली व्यथा मांडली. पण त्याकडे लक्ष दिले नाही. त्यांनी राजीनामा दिला का? देलकर प्रकरणात भाजपाचे हात अडकले असून हे दाबण्यासाठी कुभांड रचलं गेले आहे हे पत्रातून स्पष्ट होत आहे, असे सावंत यांनी म्हटले आहे.
क्लिक करा आणि वाचा- क्लिक करा आणि वाचा-
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times