सध्या मुंबईत २० ते २३ हजार चाचण्या केल्या जात आहेत. कोरोनाच्या उद्रेकाला रोखण्यासाठी आखण्यात आलेल्या महापालिकेच्या मिशन टेस्टिंग अंतर्गत मुंबईतील गर्दीची ठिकाणे असलेले मॉल्स, रेल्वे स्थानके, बस स्थानके, इतर गर्दीची ठिकाणे, बाजारपेठा अशा ठिकाणांवर दररोज ५० हजार चाचण्या करण्यात येणार आहेत.
… तर होणार कारवाई
कोणत्याही परिस्थितीत मुंबईत झालेला करोनाचा उद्रेक महापालिकेला रोखायचा आहे. त्यासाठी आता गर्दीच्या ठिकाणी करोना चाचण्या घेण्यात येणार आहेत. मात्र असे अनेक लोक आहेत जे या चाचण्यांना नकार देऊ शकतात याची कल्पना महापालिकेला आहे. आपले हे मिशन अपयशी ठरू नये यासाठी महापालिकेने कारवाईचा बडगा देखील तयार ठेवला आहे. जो कोणी सार्वजनिक ठिकाणी ही चाचणी करण्यास नकार देईल, अशावर कारवाई करण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. या प्रमाणे मुंबईतील एकूण २७ प्रमुख मॉल्समध्ये येणाऱ्या प्रत्येक ग्राहकाची मॉल बाहेरच चाचणी घेतली जाणार आहे. ही चाचणी निगेटीव्ह आली तर त्या ग्राहकाला मॉलमध्ये प्रवेश दिला जाणार आहे.
क्लिक करा आणि वाचा-
प्रत्येक मॉलमध्ये दरदिवशी कमीतकमी ४०० चाचण्या करण्याचा महापालिकेचा प्रयत्न आहे. ज्या मॉलमध्ये चाचण्या करण्यात येतील अशा मॉल्समध्ये फिनीक्स, रुनवाल, पॅलेडियम, इन्फिनिटी, इनॉर्बिट अशा मोठ्य मॉल्सचा समावेश आहे. हे मॉल गर्दीची मोठी ठिकाणेच आहेत. या मॉल्समध्ये हजारो ग्राहक येत असतात.
या बरोबरच महापालिकेने प्रत्येक वॉर्डमध्ये रोज किमान १००० चाचण्या करण्याचे लक्ष्य ठेवले आहे. रेस्टॉरंट्स, हॉटेल्स, खाण्याची इतर ठिकाणे, फेरीवाले, पर्यटनस्थळे, बाजारपेठा, चौपाट्या आणि शासकीय कार्यालये अशा ठिकाणीही अँटिजेन चाचण्या करण्यात येणार आहेत.
क्लिक करा आणि वाचा-
मुंबईतील रेल्वे स्थानकांवर देखील चाचण्या घेण्यात येणार आहेत. विशेषत: लांब पल्ल्याच्या गाड्या ज्या स्थानकांवर थांबतात अशा मुंबई सेंट्रल, दादर, वांद्रे, सीएसएमटी, कुर्ला, अंधेरी, बोरिवली अशा स्थानकांवर रोज १००० चाचण्या करण्यात येणार आहेत. याबरोबरच विदर्भ आणि दिल्ली, गोवा, गुजरात राज्यामंधून येणाऱ्या प्रवाशांवर विशेष नजर ठेवली जाणार आहे.
या बरोबरच मुंबईतील मुंबई सेंट्रल, परळ, कुर्ला-नेहरू नगर आणि बोरिवली बस स्थानकांमध्ये देखील रोज सुमारे १ हजार प्रवाशांच्या चाचण्या केल्या जाणार आहेत.
क्लिक करा आणि वाचा-
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times