म. टा. प्रतिनिधी, जळगाव

जळगाव महापालिकेतील भाजपाच्या ५७ पैकी २७ नगरसेवकांनी आमदार सुरेश भोळे यांच्या कार्यपध्दतीबद्दल नाराजी व्यक्त करीत बंडखोरी केली. या नगरसेवकांनी महापौर, उपमहापौर निवडणुकीत शिवसेनेला मदत करुन सेनेचे महापौर निवडून आणला. या विषयावर प्रथमच भाजपचे आमदार सुरेश भोळे यांनी जाहीर भूमिका व्यक्त करतांना फुटीर नगरसेवक करीत असलेले आरोप हे आपल्या बदनामीचे छडयंत्र असल्याची टीका आज एका पत्रकार परिषदेत केली. राज्यात असलेल्या अभद्र युतीचेच संस्कार स्थानिक पातळीवर झाल्याचे जळगावातील ही युती उदाहरण आहे, असा घणाघात देखील भोळे यांनी केला. ( has asked why chief minister uddhav thackeray is interested in )

जळगाव महापालिकेत भाजपातून फुटून गेलेल्या २७ नगरसेवकांनी शिवसेनेला मदत केल्याने सत्तांतर घडले. या नगरसेवकांनी प्रतिक्रिया देतांना जळगावचे यांच्या कार्यपध्दतीवर नाराज असल्यानेच बंडखोरी केल्याचे स्पष्ट केले होते. गेल्या चार दिवसांपासून सुरु असलेल्या या नाट्यावर आमदार सुरेश भोळे यांनी अद्याप प्रतिक्रिया व्यक्त केली नव्हती. त्यांनी आज पत्रकार परिषदेत या विषयावर आपली भूमिका मांडली.

हे माझ्या बदनामीचे छडयंत्र

यावेळी आमदार भोळे यांनी सांगीतले की, भाजपातून फुटून गेलेले नगरसेवक कश्यासाठी बाहेर पडलेत हे जनतेला माहीत आहे. मात्र, त्यांनी निमित्त म्हणून माझ्यावर व आमचे नेते गिरीश महाजन यांच्यावर आरोप केले आहेत. काही जणांना महापालिकेत भाजपाची सत्ता जळगावात भाजपाचा आमदार हे सहन झाले नसल्याने असे छडयंत्र रचल्याचा आरोपही भोळे यांनी केला. सर्वांना सोबत घेवून जाण्याची भाजपाची भूमिका आहे. सर्व नगरसेवकांना न्याय दिला होता. भाजपानेच सत्तेत असतांना व नसतांना सुध्दा शासनाकडून १०० कोटीचा निधी, शिवाजी नगर व पिंप्राळा पुलासाठीचा निधी आणला. हुडकोचे कर्ज फेडले. जळगावचे धुळगाव कुणी केले हे जनतेला माहीती आहे. अमृत योजना व भूमिगत गटारींचे काम सुरु असल्याने रस्त्यांची कामे करता आली नाहीत. आता ही कामे संपणार असल्याने भाजपाची सत्ता असतांना महापालिकेत ७० कोटींच्या रस्त्यांच्या कामांसाठी अंदाजपत्रकात तरतूद केल्याचेही त्यांनी सांगीतले. त्यामुळे विकास होत नाही हा फुटीर नगरसेवकांचा आरोप चुकीचा असल्याचेही ते म्हणाले.

क्लिक करा आणि वाचा-
फुटलेल्या या नगरसेवकांना भाजपामधील शिस्त मानवली नाही. तसेच चूकीच्या कामांना मी विरोध केल्यानेच ते नाराज झाले असतील. मी कुणाशीही चुकीच्या पध्दतीने वागलो नसल्याचेही आमदार भोळे यांनी स्पष्ट केले. या सर्व नगरसेवकांना पदे देवून त्यांच्या वार्डात समान कामे करुन न्याया दिला होता.

क्लिक करा आणि वाचा-

नगररचना विभागात भ्रष्टाचार

महापालिकेच्या नगररचना विभागात मोठा भ्रष्टाचार आहे. तेथिल कॅमेऱ्याचे चित्रिकरण काही पदाधिकाऱ्यांच्या मोबाईलमध्ये दिसते. त्याच्या साह्याने चुकीचे काम केले जात असल्याचा आरोप देखील आमदार भोळे यांनी केला. आता याकडे आम्ही लक्ष ठेवून राहणार असल्याचेही भोळे यांनी सांगितले.

क्लिक करा आणि वाचा-

पक्षांतर बंदी कायद्यान्वये कारवाई

दऱम्यान भाजपातून फुटलेल्या त्या नगरसेवकांवर पक्षांतर बंदी कायद्यान्वये अपात्रतेच्या कारवाईसाठी भाजपा सक्षम न्यायालयात जाणार असल्याची माहीती अॅड. शुचिता हाडा यांनी दिली. तसेच महापौर, उमहापौर निवडीची प्रक्रीया पूर्णपणे बेकायदेशीर होती. आमच्या हरकतींवर कारवाई करण्यात न आल्याने त्यासाठीही न्यायालयात जाणार असल्याचे हाडा यांनी सांगीतले

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here