मुंबई: मुंबईचे माजी पोलीस आयुक्त यांनी गृहमंत्री यांच्यावर गंभीर आरोप करणारं पत्र मुख्यमंत्री यांना लिहिल्याचं समोर आल्यानंतर एकच खळबळ उडाली असताना मुख्यमंत्री कार्यालयाकडून या पत्राबाबत महत्त्वाचे स्पष्टीकरण देण्यात आले आहे. त्यातून या पत्राच्या सत्यतेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे. (CMO Maharashtra On )

वाचा:

गृहरक्षक दलाचे कमांडट जनरल परमबीर सिंग यांच्या नावाने मुख्यमंत्री सचिवालयाच्या अधिकृत ई-मेलवर आज दुपारी ४.३७ वाजता पत्र प्राप्त झाले आहे. paramirs3@gmail.com या ई-मेल पत्त्यावरून परमबीर सिंग असे केवळ नाव लिहिलेले व स्वाक्षरी नसलेल्या या पत्राचा ई-मेल पत्ता तपासून घेण्यात येत आहे. त्याचप्रमाणे परमबीर सिंग यांना गृह विभागामार्फत संपर्क साधण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे, असे मुख्यमंत्री कार्यालयाने स्पष्ट केले आहे.

वाचा:

वास्तविक पाहता परमबीर सिंग यांनी अधिकृतरित्या आयपीएस अधिकाऱ्यांच्या यादीसाठी दिलेला वैयक्तिक ई-मेल पत्ता parimbirs@hotmail.com असा आहे. त्यामुळे आज प्राप्त झालेला ई-मेल तपासून घेणे आवश्यक आहे, असेही मुख्यमंत्री कार्यालयामार्फत पुढे नमूद करण्यात आले आहे.

परमबीर यांच्या लेटरबॉम्बने खळबळ

मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांचे स्फोटक पत्र आज समोर आल्याने राजकीय वर्तुळात तसेच महाराष्ट्र पोलीस दलात भूकंप झाला. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना लिहिलेल्या या पत्रात परमबीर सिंग यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांना लक्ष्य केले. देशमुख यांनी यांना महिन्याला १०० कोटी वसुलीचे टार्गेट दिले होते, यासह अनेक गंभीर आरोप परमबीर यांनी या पत्रात केले. त्यानंतर देशमुख यांनी परमबीर यांचे सर्व आरोप फेटाळत हे षडयंत्र असल्याचा दावा केला व याची निष्पक्ष चौकशी व्हावी, अशी स्वत: मुख्यमंत्र्यांना विनंती केली. या सर्व घटनाक्रमात जे पत्र व्हायरल झाले त्यावर परमबीर यांची स्वाक्षरीच नसल्याचे समोर आल्याने संभ्रम निर्माण झाला आहे. या पत्रावर मुख्यमंत्री कार्यालयाने स्पष्टीकरण दिलेले असले तरी परमबीर सिंग यांची मात्र अद्याप कोणतीच प्रतिक्रिया आलेली नाही.

वाचा:

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here