गृहमंत्री अनिल देशमुख यांनी मुंबई पोलीस दलातील निलंबित पोलीस अधिकारी सचिन वाझे यांना दरमहा १०० कोटी रुपये वसुलीचे टार्गेट दिले होते, असा आरोप मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी केल्याने एकच खळबळ उडाली आहे. परमबीर सिंह यांनी केलेल्या आरोपांनंतर महाविकास आघाडी सरकार अडचणीत सापडले असल्याची चर्चा आहे. याबाबत संजय राऊत यांनी प्रतिक्रिया देण्यास नकार दिला होता. मात्र, आता त्यांनी केलेलं एक ट्वीट चर्चेचा विषय ठरत आहे.
वाचा:
संजय राऊत यांनी रविवारी सकाळीच एक ट्वीट केलं आहे. त्यांनी नेहमीप्रमाणेच शायरीतून त्यांच्या भावना व्यक्त केल्या आहेत. त्यामुळं त्यांच्या ट्वीटचा नेमका अर्थ काय याविषयी चर्चा रंगली आहे.
वाचा:
काय आहे ट्वीट
हमको तो तलाश बस नये रास्तों की है
हम है मुसाफिर ऐसे जो मंझिल से आए है
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times