मुंबई: बॉलिवूडची मर्दानी अर्थात अभिनेत्री आज ४३ वा वाढदिवस साजरा करत आहे. राणीचा जन्म २१ मार्च १९७८ रोजी बंगाली कुटुंबात झाला होता. राणीनं आपल्या अभिनयाच्या जोरावर बॉलिवूडमध्ये स्वतःची वेगळी जागा निर्माण केली आहे. पण सुरुवातीचा काळ तिच्यासाठी खूप कठीण होता. तिचा आवाजामुळे तिला पदार्पणाच्या सुरुवातीला संघर्ष करावा लागला होता.

आज राणी मुखर्जी फक्त तिच्या दमदार अभिनयासाठीच नाही तर आवाजासाठी सुद्धा ओळखली जाते. पण तिनं जेव्हा बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं त्यावेळी ही परिस्थिती अगदी उलट होती. राणीनं जेव्हा बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं त्यावेळी त्या काळच्या आदर्श अभिनेत्रीच्या आवाजाच्या मापदंडाप्रमाणे राणीचा आवाज नाजूक नव्हता. असं असताना ‘गुलाम’ चित्रपटात तिचा आवाज डब करण्यात आला. याबाबत बोलताना राणी मुखर्जी एका मुलाखतीत म्हणाली होती, ‘मी जेव्हा ‘गुलाम’चं शूटिंग पूर्ण केलं त्यावेळी , चित्रपटाचे दिग्दर्शक विक्रम भट्ट आणि निर्माता मुकेश भट्ट यांचं असं मत होतं की माझा ओरिजिनल आवाज हा या चित्रपटातील व्यक्तीरेखेशी मिळता-जुळता नाही. त्यामुळे त्यांनी माझ्या जागी दुसऱ्या आर्टिस्टचा आवाज डब करून वापरला.’

‘गुलाम’ चित्रपटासोबतच राणी मुखर्जी करण जोहरच्या ‘कुछ कुछ होता है’चं शूटिंग करत होती. राणीच्या पहिल्याच चित्रपटात तिचा आवाज डब करण्यात आला होता. मात्र करणनं राणीला सांगितलं की, तो या चित्रपटात राणीचा आवाज डब करणार नाही तिचा ओरिजिनल आवाजच चित्रपटात वापरला जाईल.

‘बीबीसी’ला दिलेल्या मुलाखतीत राणी मुखर्जीनं याविषयी सांगितलं होतं. ती म्हणाली, ‘करण नवा दिग्दर्शक होता. तो माझा आवाज दुसऱ्या आर्टिस्टकडून डब करून घेऊ शकत होता. मात्र त्यानं असं केलं नाही. त्यानं माझ्यावर विश्वास ठेवला. ‘माझा आवाज माझा आत्मा आहे’ हा त्याचा विश्वास पुढच्या काळात माझी ताकद झाला.’

राणी पुढे म्हणाली, ‘आमिर खाननं जेव्हा ‘कुछ कुछ होता है’ पाहिला तेव्हा त्यानं मला फोन केला आणि माझी माफी मागितली. तो म्हणाला, मला विश्वास नव्हता की तुझा आवाज चित्रपटासाठी चांगला वाटू शकतो. पण हा चित्रपट पाहिल्यावर मी माझे शब्द मागे घेतो. तुझा आवाज खूप चांगला आहे.’

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here