विहिरीच्या खोदकामाकरिता वापरण्यात येत असलेल्या जिलेटिन स्फोटकाची खरेदी व देवाणघेवाणीच्या माध्यमातून सातरगाव येथील सोनोने याने व्यवहार केला होता. तिवसा येथून स्फोटके घेऊन जात असताना रात्रीच्या वेळेला पंचवटी चौकात ड्युटीवर असलेल्या वाहतूक पोलिसांना संशय आल्याने त्यांनी दुचाकीवर असलेल्या लोकांचा पाठलाग केला होता. तेव्हा तिवसा पोलिसांनी याची चौकशी केली असता, सुमित सोनोने याचे नाव समोर आले.
चौकशी केली असता, या प्रकरणात अंकुश मोहन लांडगे व कमलेश नंदकिशोर दापूरकर हे सोनोने याच्याकडून स्फोटके खरेदी करून घेऊन जात होते, अशी माहिती मिळाली. त्यामुळे या दोघांनाही तिवसा पोलीसांनी गावातून अटक केली आहे. यातील सर्व आरोपींविरोधात पोलिसांनी विविध कलमान्वये गुन्हे दाखल केले आहेत. या आरोपींना अमरावती न्यायालयाने पोलीस कोठडी सुनावली आहे. तिवसा पोलीस पुढील तपास करत आहेत.
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times