सिंधुदुर्ग: परमबीर सिंग यांनी मुख्यमंत्री आणि राज्यपालांना जे पत्र दिलं. त्या पत्रात आश्चर्य करण्यासारख्या अनेक गोष्टी आहेत. सचिन वाझे हा कोणाचा माणूस आहे. कुणासाठी काम करत होता हे उभा महाराष्ट्र आता ओळखत आहे. त्यामुळे या प्रखरणात जितके गृहमंत्री जबाबदार आहेत तेवढेच मुख्यमंत्री ही जबाबदार आहेत, अशी घणाघाती टीका भाजपचे आमदार नितेश राणे यांनी केली आहे.

मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांचे स्फोटक पत्र समोर आल्याने राजकीय वर्तुळात तसेच महाराष्ट्र पोलीस दलात भूकंप झाला. तर, देवेंद्र फडणवीस यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. गृहमंत्र्यांच्या राजीनाम्यासाठी भाजपनं आक्रमक भूमिका घेतली आहे तर, राज्यभरात ठाकरे सरकारविरोधात आंदोलन पुकारवलं आहे. भाजपचे आमदार नितेश राणे यांनीही या प्रकरणात मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. तसंच, यांनाही लक्ष्य केलं आहे.

अंबानी यांच्या घराजवळ स्फोटकं सापडल्याच्या दुसऱ्या दिवशी राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे परमबीर सिंग यांना भेटायला का गेले होते याची पण चौकशी व्हावी, अशी मागणी नितेश राणेंनी केली आहे. तसंच, सचिन वाझेंची वकिली कोण करत होता? त्यांची पुन्हा नियुक्ती करा असं देवेंद्र फडणवीस यांच्यावर दबाव कोण टाकत होतं? जर सरळ सरळ मुख्यमंत्र्यांचं नाव येत असेल तर या प्रकरणी फक्त गृहमंत्र्यांना कसं जबाबदार धरता येईल, असं नितेश राणेंनी म्हटलं आहे.

पब, बार, डिस्को सुरू ठेवून तुम्हाला हप्ते पाहिजे होते हे सिद्ध झालं. म्हणून सरकारला मंदिरं उघडायची नव्हती. नाईट लाईफ गँगजी मुंबईत कार्यान्वित आहे, त्यांचा या प्रकरणी काही हस्तक्षेप आहे का? २६ फेब्रुवारीला आदित्य ठाकरे परमवीर सिंगांना का भेटायला गेले होते याची पण चौकशी करण्याची मागणी आमदार नितेश राणेंनी केली आहे.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here