सोलापूर: पंढरपूर-मंगळवेढा विधानसभेची पोटनिवडणूक आघाडी सरकारसाठी प्रतिष्ठेची असल्याचे स्पष्ट संकेत आज राज्याचे उपमुख्यमंत्री यांनी दिले आहेत. उमेदवारीच्या संदर्भात मात्र आज कार्यकर्त्याचं म्हणणं एकूण घेण्यात आलं असून उद्या अंतिम उमेदवार शरद पवार यांच्याशी चर्चा करून जाहीर करणार असल्याचे पवार म्हणाले. दिवंगत आमदार यांच्या अकाली निधनामुळं रिक्त झालेल्या पंढरपूर विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत मोठी चुरस निर्माण झाली.

राष्ट्रवादीकडून भारत भालके यांच्याप्रती सहानुभूतीचा विचार करता मुलगा भगीरथ किंवा पत्नी जयश्री भालके यांच्या नावाची चाचपणी सुरु आहे. मात्र विठ्ठल सहकारी साखर कारखान्याच्या आर्थिक अडचणींचा पाढा वाचत राष्ट्रवादीतल्याच नाराज गटांनी भालके यांच्या उमेदवारीला विरोध केला आहे. त्याच अनुषंगाने आज पंढरपुरात उपमुख्यमंत्री अजित पवार आणि प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी कार्यकर्त्यांची बैठक घेतली. शिवाय प्रभावी नेत्यांशी बंद खोलीत चर्चा केली.
आजच्या चर्चेचा कल लक्षात घेऊन त्याबाबत शरद पवार यांना सांगितलं जाईल असा खुलासाही उपमुख्यमंत्री पवार यांनी यावेळी केला.

दरम्यान राज्यात मनसुख हिरेन, सचिन वाझे आणि आता परमवीर सिंग यांच्या लेटरबॉम्बमुळं राष्ट्रवादीच्या प्रतिमेला धक्का पोहचलाय. या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पंढरपुरातला उमेदवार राष्ट्रवादीच्या चिन्हावर लढणारा असला तरी तो सर्व मित्र पक्षांचा असेल, असं आवर्जून सांगितले आहे. एवढंच नाही तर प्रचारासाठी मुख्यमंत्र्यांसह काँग्रेसचेही नेते मैदानात उतरणार असल्याचेही त्यांनी म्हटलं आहे.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here