पिंपरीतील साई चौकात राहणाऱ्या २७ वर्षीय महिलेचे शनिवारी सकाळी दोघांनी अपहरण केले. याबाबत महिलेने पिंपरी पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, सकाळी दोन अनोळखी व्यक्ती घरातील व्यक्तींची चौकशी करण्यासाठी आले. त्यावेळी त्यांनी महिलेला बेशुद्ध केले. तिच्या अंगावरील दागिने आणि मोबाइल फोन चोरून तिला पुण्यातील सिंहगड रस्त्यावर सोडून पसार झाले.
सूत्रांनी सांगितले की, दोघे जण घरी आले. महिलेकडे घरातील व्यक्तींबाबत विचारणा केली. त्यानंतर तिच्या सासऱ्यांना बोलावण्यास सांगितले. त्या घरात जात असताना, तिच्या तोंडाला गुंगीचे औषध असलेले रुमाल लावले आणि तिला बेशुद्ध केले. तिचे अपहरण केले. पुण्यातील सिंहगड रस्त्यावर नेऊन तिथे सोडून दिले. काही वेळाने शुद्धीवर आल्यानंतर आपल्या अंगावरील दागिने आणइ मोबाइल गायब असल्याचे समजले. तिने पिंपरी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यानुसार पोलिसांनी दोन अनोळखी व्यक्तींविरोधात गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times