याबाबत अधिक माहिती अशी, सांगली-कोल्हापूर रोडवर जयसिंगपूर येथे डॉ. सतीश पाटील यांचे पायोस नावाचे हॉस्पिटल आहे. या हॉस्पिटलच्या परिसरात दोन दिवसांपासून गोणीत काहीतरी भरून तेथे टाकले होते. एखाद्या रुग्णाच्या नातेवाइकांची ती गोणी असेल, असे समजून त्याकडे सुरक्षारक्षकांनी दुर्लक्ष केले. सकाळी स्वच्छता करताना त्या पोत्यातून टिक-टिक असा आवाज ऐकू आला. तेव्हा कर्मचाऱ्यांनी तातडीने ही बाब डॉक्टरांच्या निदर्शनास आणून दिली. डॉक्टरांनी याबाबत पोलिसांना कळवले.
पोलीस उपअधीक्षक रामेश्वर वैजाने व जयसिंगपूरचे पोलीस निरीक्षक दत्तात्रेय बोरीगिड्डे हे घटनास्थळी पोहोचले. बॉम्ब शोध पथक, श्वानपथक आणि पोलीस यंत्रणेने अतिशय सावधगिरीने शोध घेतला. तेव्हा त्या गोणीत गावठी बॉम्ब असल्याचे निदर्शनास आले.
तो बॉम्ब पोलिसांनी निकामी केला. रुग्णालयात बॉम्ब ठेवल्याची वार्ता जयसिंगपूर शहरात कळताच, तेथे बघ्यांची प्रचंड गर्दी झाली होती. पोलिसांनी ही गर्दी हटवून अखेर बॉम्ब निकामी केल्याने या बॉम्ब प्रकरणावर पडदा पडला. हा बॉम्ब कोणी ठेवला, कधी ठेवला याबाबत पोलीस अधिक तपास करत आहेत.
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times