विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस दिल्लीत येऊन गेल्यानंतर यांनी हे पत्र मुख्यमंत्र्यांना लिहिले असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी म्हटले आहे. पवार यांच्या या वक्तव्याला सुधीर मुनगंटीवार यांनी प्रत्युत्तर दिले आहे. उद्या हे लोक परमबीर सिंग यांचा मेंदू भाजपने हॅक केला, असेही म्हणतील, अशा खोचक शब्दात मुनगंटीवार यांनी टोला लगावला आहे.
विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस दिल्लीत गेल्यानंतर राज्याच्या गृहरक्षक दलाचे प्रमुख परमबीर सिंग यांनी हे पत्र लिहिले असे सांगत शरद पवार यांनी हे कारस्थान भाजपचे असल्याचे सूचित केले. फडणवीस यांच्यावर पवार यांनी केलेला हा आरोप मुनगंटीवार यांनी स्पष्ट शब्दात फेटाळून लावला आहे.
क्लिक करा आणि वाचा-
शरद पवार यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर केलेल्या आरोपात काहीही तथ्य नसल्याचे मुनगंटीवार म्हणाले. उद्या हे लोक असेही म्हणतील की परमबीर सिंग यांचा मेंदू भाजपवाल्यांनी हॅक केला म्हणून. त्यामुळे बिनबुडाचे आरोप शरद पवार यांनी करू नये. आधी या प्रकरणात गृहमंत्री अनिल देशमुख यांचा राजीनामा घ्यावा आमि त्यानंतरच या प्रकरणाची चौकशी सुरू करावी, असेही मुनगंटीवार पुढे म्हणाले.
क्लिक करा आणि वाचा-
शरद पवार नेमके काय म्हणाले?
परमबीर सिंग यांनी पत्रात केलेले आरोप गंभीर आहेत. त्यांनी वसुलीच्या टार्गेटचे पत्रात म्हटले आहे. पण हा पैसा गेला कुठे हे मात्र सांगितलेले नाही. फडणवीसही दिल्लीला येऊन गेले होते. ते राज्यात परत आल्यानंतर परमबीर सिंग यांनी पत्र लिहिले, असे शरद पवार यांनी दिल्लीतील पत्रकार परिषदेत म्हटले आहे.
क्लिक करा आणि वाचा-
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times