मुंबई: राज्याच्या राजकारणाचा मुद्दा बनलेल्या मनसुख हिरन हत्या प्रकरणाचा उलगडा झाला आहे, अशी माहिती राज्याच्या दहशतवाद विरोधी पथकाचे (ATS) यांनी दिली आहे. लांडे यांनी फेसबुकवर या संदर्भात एक पोस्ट केलीय. त्या पोस्टमध्ये त्यांचा सॅल्यूट ठोकणारा एक फोटो दिसत आहे. अती संवेदनशील असलेल्या मनसुख हिरन हत्या प्रकरणाचा उलगडा झाला असे त्यांनी स्पष्टपणे म्हटले आहे. ( has been solved says )

डीआयजी लांडे आपल्या फेसबुक पोस्टमध्ये लिहितात, ‘अती संवेदनशील मनसुख हिरन हत्या प्रकरणाचा उलगडा झाला आहे. मी आमच्या संपूर्ण राज्य दहशतवाद विरोधी पथकाच्या पोलीस दलातील सहकाऱ्यांना सॅल्यूट करतो. त्यांनी गेल्या काही दिवसांत रात्रंदिवस एक केला आहे. त्यामुळे या प्रकरणात न्यायपूर्ण परिणाम समोर आला आहे. हे प्रकरण माझ्या संपूर्ण पोलिस कारकिर्दीतील सर्वात जटील प्रकरणांपैकी एक आहे’

क्लिक करा आणि वाचा- मनसुख हिरन प्रकरणात दोन आरोपींना अटक

मनसुख हिरन हत्या प्रकरणात राज्याच्या दहशतवाद विरोधी पथकाने दोघांना अटक केली आहे. नरेश धरे आणि विनायक शिंदे असे अटक करण्यात आलेल्या दोन आरोपींची नावे आहेत. आज दुपारी त्यांनाकोर्टात हजर करण्यात आले. त्यावेळी कोर्टाने दोन्ही आरोपींना ३० मार्चपर्यंत एटीएस कोठडी ठोठावली. यापूर्वी कोर्टाने सचिन वाझे यांना २५ मार्चपर्यंतची कोठडी मिळाली आहे.

क्लिक करा आणि वाचा-
मनसुख हिरेन प्रकरणात एटीएसने अटक केलेल्यांपैकी एक बुकी असून दुसरा आरोपी पोलीस कर्मचारी आहे. नरेश धरे हा बुकी आहे, तर विनायक शिंदे हा मुंबई पोलिसांतील माजी कॉन्स्टेबल आहे. विनायक शिंदे हा लखन भैया एन्काऊंटर प्रकरणातील दोषी आहे. तो सध्या पॅरोलवर बाहेर आहे.

क्लिक करा आणि वाचा-
मनसुख हिरन प्रकरणाचा तपास सध्या राष्ट्रीय तपास यंत्रणा अर्थात एनआयए करत आहे. हा तपास पूर्वी राज्याचे दहशतवाद विरोधी पथक अर्थात एटीएस करत होते. मात्र केंद्रीय गृह विभागाच्या आदेशानंतर हा तपास एनआयएने एटीएसकडून काढून तो स्वत:कडे घेतला आहे.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here