आज राज्यात एकूण ९९ करोना बाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर २.१५ टक्के इतका आहे. राज्यात आज ११ हजार ३१४ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत, तर आतापर्यंत एकूण २२ लाख १४ हजार ८६७ रुग्ण बरे झाले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ८९.३२ टक्क्यांवर आला आहे.
पुणे जिल्ह्यात सर्वाधिक सक्रिय रुग्ण
राज्यातील अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या २ लाख १० हजार १२० इतकी झाली आहे. पुणे जिल्ह्यात सर्वाधिक ४२ हजार ०१५ इतरे रुग्ण आहेत तर नागपूर जिल्ह्यातील आकडा वाढून तो २९ हजार ७७१ इतका झाला आहे. मुंबई पालिका हद्दीत हा आकडा २२ हजार ०८१ इतका आहे. तर ठाणे जिल्ह्यात सध्या १९ हजार ७८८ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
या बरोबरच नाशिकमध्ये सक्रिय रुग्णांची संख्या १५ हजार ६१९ इतकी आहे. अमरावतीत ही संख्या ३ हजार ५३३, औरंगाबादमध्ये १३ हजार ६८६, जळगावमध्ये ६ हजार ५१८, अहमदनगरमध्ये ४ हजार २८९ इतकी आहे. तर, कोल्हापुरात सक्रिय रुग्णांची संख्या ५१० इतकी आहे. राज्यात सर्वात जास्त सक्रिय रुग्णांची संख्या पुण्यात आहे. तर, सर्वात कमी सक्रिय रुग्णांची संख्या गडचिरोली जिल्ह्यात आहे. येथे सक्रिय रुग्णांची संख्या ३१४ इतकी आहे.
९,६९,८६७ व्यक्ती होम क्वारंटाइन
आतापर्यंत तपासण्यात आलेल्या १ कोटी ८३ लाख ५६ हजार २०० प्रयोगशाळा नमुन्यांपैकी २४ लाख ७९ हजार ६८२ (१३.५१ टक्के ) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात ९ लाख ६९ हजार ८६७ व्यक्ती होमक्वारंटाइनमध्ये आहेत. तर, ९ हजार ६०१ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाइनमध्ये आहेत.
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times