नवी दिल्लीः राष्ट्रवादी काँग्रेसचे (ncp ) अध्यक्ष शरद पवार ( ) यांच्या दिल्लीतील निवासस्थानी आघाडीतील नेत्यांची बैठक झाली. ही बैठक जवळपास अडीच तास चालली. या बैठकीनंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी माध्यमांशी संवाद साधला. गृहमंत्री अनिल देशमुख ( ) यांच्या राजीनाम्याचा प्रश्न उद्भवत नाही, असं जयंत पाटील ( ) यांनी स्पष्ट केलं आहे.

दिल्लीत शरद पवार यांच्या निवासस्थानी झालेल्या बैठीकत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार, पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, खासदार सुप्रिया सुळे, वरिष्ठ नेते प्रफुल्ल पटेल हे उपस्थित होते. शिवसेनेकडून संजय राऊत आणि काँग्रेसकडून वरिष्ठ नेते कमलनाथ हे उपस्थित होते. जवळपास अडीच तास महाराष्ट्रातील एकूण स्थितीवर चर्चा करण्यात आली.

परमबीर सिंग यांच्या पत्र प्रकरणावरून महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकारवर भाजपने जोरदार हल्ला चढवत गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या राजीनाम्याची मागणी केली. पण आता राष्ट्रवादी काँग्रेस गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या पाठिशी ठामपणे उभी असल्याचं समोर आलं आहे. दिल्लीत शरद पवार यांच्या निवासस्थानी आघाडीतील वरिष्ठ नेत्यांची बैठक झाली. या बैठकीनंतर जयंत पाटील यांनी माध्यमांना माहिती दिली. अनिल देशमुख यांच्या राजीनाम्याचा प्रश्नच उद्भवत नाही, असं जयंत पाटील म्हणाले.

मुंबईत मुकेश अंबानींच्या घराबाहेर कारमध्ये आढळलेली स्फोटकं आणि मनसुख हिरण यांच्या हत्ये प्रकरणी महाराष्ट्र एटीसए आणि एनआयएकडून सखोल तपास सुरू आहे. या तपासून नक्कीत ठोस माहिती समोर येईल. यातून ज्यांनी गुन्हे केले आहेत, त्यांना शोधून काढलं जाईल. सरकारने आता या प्रकरणी अधिक लक्ष केंद्रीत केलं आहे. विरोधकांचे आरोप हे या प्रकरणापासून लक्ष विचलीत करणारे आहेत. यामुळे अनिल देशमुख यांचा राजीनामा घेतला जाणार आहे. तसंच या मुद्यांवर येत्या दोन दिवसांत म्हणजे उद्या आणि परवा शिवसेना आणि काँग्रेस नेत्यांशी चर्चा केली जाईल, अशी माहिती जयंत पाटील यांनी दिली.

परमबीर सिंग यांच्या आरोपानंतर मुंबई पोलिसांच्या कार्यपद्धतीतील काही उणीवा समोर आल्या आहेत. यामुळे मुंबई पोलीसातील पारदर्शकता वाढवली पाहिजे. या सर्व बाबतीत चौकशी होण्याची गरज आहे. आणि जुलीओ रिबेरो यांच्या मार्फत ही चौकशी किंवा त्यांचा सल्ला घेतला पाहिजे, असं शरद पवार म्हणाले. पण आता या प्रकरणी मुख्यमंत्री जो निर्णय घेतील त्यानुसार पुढील कारवाई होईल, असं जयंत पाटील यांनी सांगितलं.

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या काळात अनेक मंत्र्यांवर अरोप झाले. त्यावेळी फडणवीसांनी कोणाचेच राजीनामे घेतले नाहीत. मग अनिल देशमुखांचा राजीनाम्याचा मुद्दा येतच नाही, असं जयंत पाटील म्हणाले.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here