मुंबई: पत्रप्रकरणी ( letter) राज्याचे गृहमंत्री (Anil Deshmukh) यांचा तत्काळ राजीनाम घेण्यात यावा अशी विरोधी पक्षांकडून मागणी होत असताना आता देशमुख यांच्यावर गुन्हा नोंदवून त्यांना अटक करावी अशी मागणी पुढे आले आहे. तशी लेखी तक्रारच मुंबईतील मलबार हिल पोलिस ठाण्यात नोंदवण्यात आली आहे. ( should be booked and arrested demands ad jayashree patil)

राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याविरोधात गुन्हा नोंदवून अटक करा, अशी मागणी अॅडव्होकेट जयश्री पाटील यांनी केली आहे. माजी मुंबई पोलिस आयुक्त परमबीर सिंग यांनी मुख्यमंत्र्यांना दिलेले पत्र व त्यातील माहिती स्वयंस्पष्ट असल्याचे त्यांचे म्हणणे आहे. गृहमंत्री अनिल देशमुख, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि निलंबित पोलिस अधिकारी सचिन वाझे हे सर्व लोकसेवक आहेत. सत्तेच्या बळावर कोणीही कायद्याच्या कचाट्यातून स्वत:ची सुटका करून घेऊ शकत नाही, हे सुप्रीम कोर्टाने पी. व्ही. नरसिंह राव विरुद्ध सीबीआय प्रकरणात स्पष्ट केलेले आहे. त्यामुळे मंत्र्यांविरोधात गुन्हा दाखल करण्याआधी पूर्वपरवानगीची आवश्यकता नाही, असे पाटील यांनी तक्रारीत म्हटले आहे.

सर्वसामान्य पद्धतीने गंभीर गुन्ह्यांमधील आरोपींवर जशी कारवाई होते, तशीच कारवाई करून गुन्हा दाखल होणे गरजेचे आहे. अन्यथा पुरावे नष्ट होण्याचे प्रयत्न होऊ शकतात, असे पाटील यांनी नमूद केले आहे. अनिल देशमुख व त्यांच्या कुटुंबीयांशी संबंधित, शरद पवार व परमबीर सिंग यांची भेट, अनिल देशमुख व सचिन वाझे यांच्यातील संभाषण इत्यादी पुरावे जतन होणे गरजेचे आहे, असे यांचे लेखी तक्रारीत म्हटले आहे.

क्लिक करा आणि वाचा-

‘दोन दिवसांत निर्णय घेणार’

दरम्यान, येत्या दोन दिवसांत गृहमंत्री अनिल देशमुख यांचा राजीनामा घेण्याबाबत निर्णय घेतला जाईल, असे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी दिल्लीत पत्रकार परिषद घेऊन जाहीर केले आहे. मात्र, अनिल देशमुख यांचा राजीनामा घ्यायचा की नाही हे ठरवण्याचा अधिकार मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा असल्याचेही ते म्हणाले. दरम्यान परमबीर सिंग यांनी गृहमंत्री देशमुख यांच्यावर केलेले आरोप गंभीर असल्याचे मत पवार यांनी व्यक्त केले आहे.

क्लिक करा आणि वाचा-क्लिक करा आणि वाचा-

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here