म. टा. प्रतिनिधी,

जळगाव जिल्ह्यातील भाजपा नेते व माजीमंत्री () यांना करोनाची लागण झाली आहे. त्यांना झालेल्या या करोनावर राष्ट्रवादीचे नेते व माजी मंत्री (Eknath Khadse) यांनी संशय व्यक्त करीत एवढ्या सुदृढ नेत्याला कसा झाला? याचा तपास झाला पाहीजे असे म्हणत गिरीश महाजन यांच्यावर पलटवार केला आहे. याआधी गिरीश महाजन यांनी एकनाथ खडसे यांना तिनवेळा झालेल्या करोनाचे संशोधन केले पाहीजे अशी टीप्पणी केली होती.

एकनाथ खडसे यांच्या कोरोनाबाबत माजी मंत्री गिरीश महाजन यांनी खडसे यांना झालेल्या कोरोनावर प्रश्न चिन्ह उपस्तीत करून खडसे याना झालेला कोरोना कोणत्या प्रकारचा आहे ? यावर संशोधन व्हावे अशी मागणी केली होती. आता गिरीश महाजन यांना करोनाची लागण झाल्यानतंर खडसे यांनी जळगावात माध्यमांशी बोलतांना महाजन यांना झालेल्या करोनावर संशय व्यक्त करुन महाजन यांच्या वक्तव्याची परतफेड केली आहे.

क्लिक करा आणि वाचा-
खडसे यांनी सांगीतले की, आपल्याला झालेला कोरोना खरा होता. मात्र, गिरीश महाजन यांना झालेला कोरोना हा खरा आहे का ? की, जळगाव मनपामध्ये भाजपची सत्ता गेल्याचा हा कोरोना आहे. कारण गिरीश महाजन हे नियमित व्यायाम करून फिट राहतात. यंग नेता म्हणून ते परिचित आहेत त्यामुळे त्यांचा कोरोना बाबत खरच आहे का असा तपास केला पाहीजे, या शब्दात खडसे यांनी महाजनांना टोला लगावला आहे.

क्लिक करा आणि वाचा-
जळगाव महापालिकेध्ये गेले अडीच वर्ष भाजपाची सत्ता होती. मात्र, या काळात जळगावात कोणताही प्रमुख विकास काम करण्यात आले नाही. त्यामुळे नागरिक आणि नगरसेवक नाराज होते. त्याचा परिणाम म्ह्णून २७ नगरसेवक स्वतःहून भाजप सोडून बाहेर पडले. याच भाजपाने आत्मचिंतन केले पाहीजे. गिरीश महाजन यांच्या नेतृत्वाच हे अपयश आहे. सत्तेत असतांना महाजन यांच्या अहंपणा, नगरसेवकांबाबतचा तुच्छपणा याचा परिणाम म्हणून हे सर्व घडलं असल्याचेही खडसे म्हणाले.

क्लिक करा आणि वाचा-

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here