तीरथ सिंह रावत हे एका कार्यक्रमात बोलत होते. आपल्याला २०० वर्षे गुलाम बनवणारी अमेरिका करोना संकटामुळे हादरली आहे. मात्र इतर देशांच्या तुलनेत भारताने करोनाविरोधी लढाईत चांगली कामगिरी केली आहे. अमेरिकेने २०० वर्षे गुलाम बनवले आणि आता जदगावर राज्य करत आहे. पण करोनाविरोधातील लढाईत अमेरिकेला संघर्ष करावा लागत आहे, असं तीरथ सिंह रावत म्हणाले.
उत्तराखंडचे नवे मुख्यमंत्री झालेले तीरथ सिंह रावत यांनी यापूर्वीही वादग्रस्त वक्तव्य केली आहेत. पंतप्रधान मोदींची तुलाना त्यांनी भगवान राम आणि कृष्णाशी केली आहे. यानंतर त्यांच्या या वक्तव्यावर जोरदार टीका झाली. त्यानंतर महिलांच्या फाटक्या जिन्सवर त्यांनी आक्षेप घेतला. महिला फाटक्या जिन्ह घालतात. त्यांचे गुडघे उघडे दिसतात. ही आपली संस्कृती नाही, असं रावत म्हणाले होते. त्यावरून त्यांच्यावर जोरदार टीका झाली होती.
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times