सोलापूर: (Solapur) जिल्ह्यात करोनाचा वाढता प्रभाव लक्षांत घेता महसूल आणि पोलीस प्रशासनाकडून समान्यजनांसाठी कडक निर्बंध लादण्यात येत आहेत. तर, अंमलबजावणी करताना लाखांवर दंड वसुल करण्यात येत आहे. मात्र आज पंढरपूरांत खुद्द राज्याचे उपमुख्यमंत्री (Ajit Pawar) यांच्या उपस्थितीत करोना प्रतिबंधात्मक उपाययोजनांचा फज्जा उडाल्याचे चित्र पाहायला मिळाले. (the rule of physical distance was not followed in the meeting of deputy chief minister )

सध्या पंढरपूर विधानसभा मतदारसंघाची पोटनिवडणुक लागली आहे. त्यानिमित्ताने उमेदवारी निश्चित करण्यासाठी तसेच कार्यकर्त्यांचा कल जाणून घेण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील हे आज पंढरपूर दौऱ्यावर आले होते. या दौऱ्यात त्यांनी कराड रोडवरील श्रीयश या वातानुकूलित कार्यालयात पक्ष कार्यकर्त्यांची बैठक घेतली. या बैठकीला जवळपास हजारावर लोक आले होते. त्यात मास्क वगळता करोनाच्या पार्श्वभूमीवर फिजिकल डिस्टनसिंगचा बोजवारा उडाल्याचे चित्र पाहायला मिळाले. सभागृहात घोषणाबाजी सुरु होती. त्यामुळं सध्या पंढरपूर शहरात उपमुख्यमंत्री अजित पवारांना वेगळा कायदा आणि सर्वसामान्य जनतेला वेगळा कायदा आहे का ? असा सवाल उपस्थित केला जात आहे.

क्लिक करा आणि वाचा-

याबाबत वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी माहिती देताना सांगितले की, आचार संहिता लागू आहे. त्यामुळं महसूल प्रशासन, निवडणूक निरीक्षकांनी तक्रार दिल्यास गुन्हा दाखल होऊ शकतो.

क्लिक करा आणि वाचा-

क्लिक करा आणि वाचा-

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here