रायपूर: दिग्गज खेळाडूंचा समावेश असलेल्या ( )च्या अंतिम सामन्यात ()ने ()चा १४ धावांनी पराभव केला आणि विजेतेपद मिळवले. भारताने प्रथम फलंदाजी करत १८१ धावा केल्या होत्या. उत्तरादाखल श्रीलंकेला १६७ धावा करता आल्या. सचिन तेंडुलकरच्या नेतृत्वाखाली भारताने पहिल्या रोड सेफ्टी वर्ल्ड सीरीजचे जेतेपद मिळवले.

वाचा-

अंतिम सामन्यात श्रीलंकेच्या संघाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. भारताच्या डावाची सुरूवात विरेंद्र सेहवाग आणि सचिन तेंडुलकर यांनी केली. या दोघांकडून मोठ्या भागिदारीची अपेक्षा होती. पण सेहवाग १० धावा करून माघारी परतला. त्यानंतर लंकेच्या सनथ जयसूर्याने बद्रीनाथची विकेट घेत भारताला दुसरा धक्का दिला.

वाचा-

वाचा-

२ बाद ३५ अशा धावसंख्येवरून सचिन आणि युवराज सिंग यांनी भारताला पुढे नेण्याचा प्रयत्न केला. गेल्या दोन सामन्यात अर्धशतक करणारा सचिन लय मध्ये दिसत होता. पण तो ३० धावा करुन माघारी परतला. सचिनच्या जागी आलेल्या युसूफ पठाणने युवराज सिंगच्या सोबत श्रीलंकेच्या गोलंदाजांची धुलाई केली. युवराजने ३५ चेंडूत ३ षटकार आणि ४ चौकारांसह ५० धावा केल्या. तो ६० धावांवर बाद झाला. या दोघांनी चौथ्या विकेटसाठी ९५ धावांची भागिदारी केली.

वाचा-

युवी बाद झाल्यानंतर युसूफ पठाणने धावांची गती कमी होऊ दिली नाही. त्याने एका बाजूने चौकार, षटकार सुरूच ठेवले. त्याने ६२ धावा केल्या. तर इरफानने ३ चेंडूत ८ धावा केल्या.

वाचा-

विजयासाठी १८२ धावांचे लक्ष्य घेऊन मैदानात उतरलेल्या श्रीलंकेने चांगली सुरूवात केली. एका टप्प्यावर श्रीलंका सामन्यात आघाडीवर होता.तिलकरत्ने आणि जयसूर्या यांनी पहिल्या विकेटसाठी ६ २ धावा जोडल्या. युसूफने तिलकरत्नेला २१ वर बाद केले. त्यानंतर इरफानने लंकेला दुसरा धक्का दिला. ८३ धावसंख्येवर इरफानने जयसूर्यला ४३ धावांवर बाद करत मोठी विकेट मिळवली. श्रीलंकेच्या फलंदाजांनी अखेरपर्यंत लढत दिली. त्यांना १२ चेंडूत ३० धावा हव्या होत्या. अखेरच्या षटकात २४ धावांची गरज असताना त्यांनी पहिल्याच चेंडूवर षटकार मारला. पण मुनाफ पटेलने शानदार गोलंदाजी करत १४ धावांनी विजय मिळून दिला. भारताकडून पठाण बंधूंनी प्रत्येकी २ विकेट तर गोनी आणि पटेल यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here