रिबोरो हे एनडीटीव्हीशी बोलत होते. अशा प्रकारचे काम करण्याचे आता माझे वय राहिलेले नाही आणि जरी मी ते काम करू शकत असेन तरी देखील मी ते काम स्वीकारणार नाही, असेही रिबेरो म्हणाले. या प्रकरणात ज्या प्रकारे पैशांच्या व्यवहाराबाबत बोलले जात आहे, सचिन वाझेसारख्या एन्काउंटर स्पेशलिस्ट आपल्याला एखादे पद मिळवण्यासाठी कशा प्रकारची लॉबिंग करतो हे सगळे पाहून अशा प्रकारच्या प्रकरणात मी स्वत:ला जोडू इच्छित नाही.
क्लिक करा आणि वाचा-
खुद्द शरद पवार किंवा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आपल्याला या प्रकरणाची चौकशी करण्याची विनंती केली तरी आपण हे काम स्वीकारणार नाही का?, असा प्रश्न रिबेरो यांना विचारण्यात आला. मात्र त्यावरही रिबेरो यांनी ठामपणे नाही असेच उत्तर दिले. ही अतिशय अवघड अशी परिस्थिती आहे आणि ती कोणत्या दिशेला घेऊन जाईल याबाबत काही सांगता येत नाही. ज्या प्रकारे राजकारणाचा गोंधळ सुरू आहे त्याचा मला तिरस्कार आहे.
क्लिक करा आणि वाचा-
परमबीर सिंग यांना जर पैसे गोळा करण्याबाबत आपल्या कनिष्ठ अधिकाऱ्यांना सांगितले जाते हे माहीत होते, तर त्यांनी गृहमंत्र्यांना भेटून याचा जाब विचारला पाहिजे होता. आणि हे रोखणे शक्य नसेल तर त्यांनी राजीनामा द्यायला हवा होता. मात्र त्यांनी तसे केले नाही, असे रिबेरो म्हणाले.
क्लिक करा आणि वाचा-
या कामासाठी माझे नाव का घेतले गेले मला माहीत नाही. माझे आता वय झाले आहे. गृहमंत्र्यांच्या पक्षाचे प्रमुख सक्षम आहेत. त्यांनी माझ्यासारख्या ९२ वर्षांच्या निवृत्त अधिकाऱ्याला हे काम सांगण्यापेक्षा ते हे काम चांगले करू शकतात, असा टोलाही रिबेरो यांनी लगावला आहे.
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times