प्रकरणानंतर परमबीर सिंग यांनी गृहमंत्र्यांवर केलेल्या आरोपांवरून राज्यातील राजकीय वर्तुळात प्रचंड गदारोळ सुरू आहे. गृहमंत्री यांच्या राजीनाम्याची मागणी सरकारकडून सुरू आहे. या सगळ्या घडामोडींवर ‘सामना’च्या अग्रलेखातून शिवसेनेनं भाष्य केलं आहे. राज्यातील विरोधी पक्ष आणि केंद्र सरकारनं मिळून राज्यातील सरकारविरोधात हा कट रचल्याचा आरोप शिवसेनेनं केला आहे. त्यास आधार म्हणून शिवसेनेनं घटनाक्रमही सांगितला आहे. ‘महाराष्ट्रात कायदा-सुव्यवस्था ठीक नसल्याचा ठपका ठेवायचा व राष्ट्रपती राजवटीचा हातोडा हाणायचा हेच महाराष्ट्रातील विरोधी पक्षाचे अंतिम ध्येय दिसते व त्यासाठी नवी प्यादी निर्माण केली जात आहेत. परमबीर सिंग यांचा वापर याच पद्धतीने केला जात आहे,’ असं शिवसेनेनं म्हटलं आहे.
वाचा:
‘विरोधी पक्षाने केंद्रीय तपास यंत्रणांचा अतिरेकी वापर महाराष्ट्रात चालवला आहे. महाराष्ट्रासारख्या राज्यास हे परवडणारे नाही. एका बाजूला राज्यपाल राजभवनात बसून वेगळेच उपद्व्याप करीत आहेत तर दुसऱ्या बाजूला केंद्र सरकार केंद्रीय तपास यंत्रणांच्या माध्यमातून दबावाचा खेळ करीत आहे. कुठे एखाद्या भागात चार कोंबड्या व दोन कावळे विजेच्या तारांचा शॉक लागून मेले तरी केंद्र सरकार महाराष्ट्रात सीबीआय किंवा एनआयएला पाठवू शकते,’ असा टोलाही शिवसेनेनं हाणला आहे.
अग्रलेखातील ठळक मुद्दे:
परमबीर सिंग हे अगदी बेभरवशाचे अधिकारी आहेत, त्यांच्यावर विश्वास ठेवता येणार नाही असे भाजपचे कालपर्यंत मत होते. ‘सचिन वाझे यांना हटवून काय फायदा? पोलीस आयुक्तांना हटवा’ अशीच भाजपची मागणी होती. आता त्याच परमबीर यांना खांद्यावर घेऊन भाजपवाले लग्नाच्या वरातीत नाचावे तसे बेभान होऊन नाचत आहेत. हा राजकीय विरोधाभास आहे.
वाचा:
वाझे यांच्यावर मनसुख हिरेनच्या खुनाचा आरोप ठेवला आहे. या प्रकरणात एनआयए परमबीर यांना चौकशीला बोलावू शकते. त्यामुळं त्यांनी स्वतःला वाचविण्यासाठी हे असे आरोप केले आहेत. हे सत्य असेल तर भाजप परमबीर यांचा वापर सरकारच्या बदनामीसाठी करीत आहे. सरकारला फक्त बदनामच करायचे असे नाही, तर सरकारला अडचणीत आणायचे असे त्यांचे धोरण आहे.
महाविकास आघाडी सरकारजवळ आजही चांगले बहुमत आहे. बहुमतावर कुरघोडी कराल तर आग लागेल. हा इशारा नसून वस्तुस्थिती आहे. एखाद्या अधिकाऱ्यामुळे सरकारे येत नाहीत व कोसळत नाहीत, हे विरोधकांनी विसरू नये!
वाचा:
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times