शबाना यांनी त्यांच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर फोटो टाकत त्यांच्या मदतनीस महिलेबद्दल प्रेम वव्यक्त केलं आहे. हा फोटो सोशल मीडियावर प्रचंड वायरल होत आहे. या फोटोत शबाना आणि जावेद अख्तर त्या मदतनीस महिलेसोबत दिसत आहेत. महत्वाचं म्हणजे या फोटोमध्ये त्यांनी जे कपडे परिधान केले आहेत ते कपडे याच महिलेने त्यांना भेट म्हणून दिले आहेत.ते कपडे घालून त्यांनी महिलेसोबत फोटो काढला आहे. शबाना यांनी निळा आणि बेंज रंगाची साडी नेसली आहे तर जावेद यांनी पांढऱ्या रंगाचा कुर्ता पायजमा घातला आहे आणि सोबत निळ्या रंगाचा टॉवेल घेतला आहे. घरात काम करणाऱ्या मोलकरणीच्या मुलीचं लग्न झालं. त्या लग्नाचा कपड्यांटा आहेर तिनं शबाना आणि जावेद अख्तर यांना दिला.हा फोटो शेअर करत शबाना यांनी लिहिलं, ‘जयश्रीच्या मुलीचं लग्न झालं आहे आणि तिने आमच्यासाठी ही खास भेट आणली आहे. हे कपडे आम्ही घातले आहेत ते तिने भेट म्हणून दिले आहेत.’
हे वाचल्यानंतर अनेक चाहत्यांचा असा गैरसमज झाला होता की जयश्री त्यांची चाहती आहे. परंतु, मीडियासोबत बोलताना त्यांनी या गोष्टीचा खुलासा केला. एका मुलाखतीदरम्यान त्यांनी या गोष्टीची माहिती दिली की, जयश्री अनेक वर्षांपासून त्यांच्या घरात काम करत आहे. ती त्यांच्या घरातील एका सदस्याप्रमाणे आहे. नुकतंच तिच्या मुलीचं लग्न झालं म्हणून तिने त्यांच्यासाठी हे कपडे भेट म्हणून आणले. महाराष्ट्रीयन लग्नांमध्ये अशी भेट देण्याची परंपरा असते असं सांगत तिने त्यांच्यासाठी ही भेट आणली. आणि त्यांनीही मनापासून त्याचा स्वीकार केला.
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times