पुण्याचे महापौर यांनी ही माहिती दिली. रुग्णसंख्या याच गतीनं वाढत राहिल्यास येत्या काळात उपचारांच्या सुविधा कमी पडू शकतात. हे लक्षात घेऊन जम्बो रुग्णालय पुन्हा सुरू करण्यात आलं आहे. ऑक्सिजन खाटांची संख्या वाढवण्यात येत आहे. २३ हजार सक्रिय रुग्णांपैकी ८५ टक्के रुग्ण स्वत:च्या घरी विलगीकरणात आहेत, ही दिलासादायक बाब आहे, असं मुरलीधर मोहोळ यांनी सांगितलं.
वाचा:
‘दररोज १५ हजार चाचण्या आणि २० हजार लसीकरण करून करोना विरोधात प्रशासन सज्ज आहे. चाचणी आणि लसीकरणाचे प्रमाण पुण्यात सर्वाधिक आहे. गरज पडल्यास खाटांची संख्या वाढवण्यात येईल. त्यासाठी खासगी रुग्णालयांनी आधीप्रमाणे सहकार्य करावे. पुण्यात लॉकडाउन नसेल मात्र आणखी कडक निर्बंध काय घालता येतील यावर विचार सुरू आहे,’ असंही मोहोळ यांनी सांगितलं.
वाचा:
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times