परमबीर सिंह यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना एक पत्र लिहलं आहे. या पत्रात गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. या लेटरबॉम्बनंतर अनिल देशमुखांच्या राजीनाम्याची मागणी होत आहे. त्यावरही संजय राऊतांनी भाष्य केलं आहे. अनिल देशमुखांचा राजीनामा हा राज्य किंवा देशासमोरील एकमेव पक्ष नाहीये. राजकारणात विरोधी पक्ष आरोप करणार आम्ही त्याला उत्तर देणार, ही प्रक्रिया चालूच राहणार. कालपर्यंत विरोधी पक्षाला परमबीर सिंह यांच्यावर विश्वास नव्हता. मात्र, आज त्यांच्याच खांद्यावर बंदूक ठेवून सरकारची प्रतिमा मलीन करण्याचा प्रयत्न होत आहे, असं संजय राऊत म्हणाले आहेत.
प्रकाश आंबेडकरांनी राष्ट्रपती राजवट लागू करण्याची मागणी केली असून, राज्यापालांची भेट घेणार असल्याबद्दल राऊत यांना प्रश्न विचारला असता. ते म्हणाले प्रकाश आंबेडकर हे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू आहेत. बाबासाहेब घटनाकार आहेत. त्यांच्याविषयी आमच्या मनात किती श्रद्धा आहे, हे नव्याने सांगण्याची गरज नाही. महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लावावी असं प्रकाश आंबेडकर सांगत असतील, तर त्यांनी पुन्हा एकदा घटनेचा अभ्यास करणं गरजेचं आहे. कारण ज्या प्रकारे खोटी प्रकरणं निर्माण करुन विरोधी पक्ष महाराष्ट्र सरकारवर दबाव टाकत किंवा एक प्रकरण बनतं. त्यामुळं राष्ट्रपती राजवट लागू शकत नाही किंबहुना केंद्र सरकार बरखास्त केलं पाहिजे. कारण हा राज्याच्या स्वायत्तेवर घाला आहे, असंही राऊत म्हणाले आहेत.
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times