मुंबई : कमॉडिटी बाजारात सोने आणि चांदीच्या दरातील घसरण थांबण्याची चिन्हे नाहीत. सोने आणखी किती स्वस्त होणार याचा जाणकारांना देखील अंदाज लावणे कठीण झाले आहे. आज सोमवारी कमॉडिटी बाजार उघडताच सोने दरात आणि चांदीच्या किमतीत घसरण झाली. सोने २५० रुपयांनी तर चांदी १४०० रुपयांनी स्वस्त झाले आहे.

आज सोमवारी मल्टी कमॉडिटी बाजारात सोन्याचा भाव ४४७६९ रुपये आहे. त्यात २५२ रुपयांची घसरण झाली आहे. एक किलो ६६१८० रुपये आहे. त्यात १३४७ रुपयांची घसरण झाली आहे. तत्पूर्वी सोने ४४७२० रुपयांपर्यंत घसरले होते.

good returns या वेबसाईटनुसार आज सोमवारी मुंबईत २२ कॅरेट सोन्याचा भाव ४३९१० रुपये इतका खाली आला आहे. २४ कॅरेट सोन्याचा भाव ४४९१० रुपये आहे. दिल्लीत २२ कॅरेट सोन्याचा भाव ४८३८० रुपये झाला आहे. २४ कॅरेटसाठी सोन्याचा भाव ४८४४० रुपये झाला आहे. चेन्नईत २२ कॅरेटसाठी ४२४९० रुपये असून २४ कॅरेटचा भाव ४६३५० रुपये आहे. कोलकात्यात २२ कॅरेट सोन्याचा भाव ४४५४० रुपये असून २४ कॅरेट सोन्याचा भाव ४७२१० रुपये आहे.

फेडरल रिझर्व्हची पतधोरणाच्या भूमिका आणि अमेरिकेतील आर्थिक स्थिती पाहता नजिकच्या काळात डॉलरचे मूल्य कमी होण्याची शक्यता नाही, असा अंदाज क्रेडीट सुस या संस्थेने व्यक्त केला आहे. त्यामुळे यूएस ट्रेझरी यिल्डमध्ये वाढ होण्याची शक्यता असून सोन्यावर परिणाम होईल. पुढील ३ ते १२ महिन्यांच्या कालावधीत सोन्याचा भाव प्रती औस १७०० डॉलर्सपर्यंत खाली येईल, असे भाकीत क्रेडीट सूसने आपल्या अहवालात व्यक्त केले आहे.

जागतिक कमॉडिटी बाजारात सोन्याचा भाव प्रती औंस १७३९ डॉलर आहे. जागतिक बाजारात अस्थिरता आणि डॉलरचे मूल्य वधारल्याने सोन्यातील तेजीसाठी पोषक वातावरण तयार झाल्याचे एचडीएफसी सिक्युरिटीजचे कमॉडिटी विश्लेषक तपन पटेल यांनी सांगितले. दिल्लीतील सराफा बाजारात शुक्रवारी सोन्याच्या किमतीत १६८ रुपयांची वाढ झाली आहे. सोन्याचा भाव ४४५८० रुपये झाला होता. तर चांदीच्या दरात १३५ रुपयांची घसरण झाली होती. एक किलो चांदीचा भाव ६६७०६ रुपये झाला होता.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here