मुंबईः सचिन वाझे प्रकरणानंतर परमबीर सिंग यांनी गृहमंत्र्यांवर केलेल्या आरोपांवरून राज्यातील राजकीय वर्तुळात प्रचंड गदारोळ सुरू आहे. राज्यात विरोधकांनी गृहमंत्री यांच्या राजीनाम्यासाठी मागणी केली आहे. यासंदर्भात महाविकास आघाडीचे नेते सावध भूमिका घेत अनिल देशमुख यांच्या राजीनाम्याबाबत अधिक बोलणं टाळत आहेत. तर, एकीकडे काँग्रेसच्याच एका ज्येष्ठ नेत्यानं अनिल देशमुख यांनी राजीनामा द्यावा, असं म्हटलं आहे. मात्र, यानंतर राज्यातील काँग्रेसनं आपली भूमिका स्पष्ट केली आहे.

काँग्रेसचे नेते राशीद अल्वी यांनी अनिल देशमुख यांनी राजीनाम्याची मागणी केली तसंच, गृहमंत्र्यांचीही चौकशी झाली पाहिजी, असं ते म्हणाले होते. परमबीर सिंह पोलीस आयुक्तपदी कायम असते तर कदाचित त्यांनी तक्रारच केली नसती. त्यांचा तपास व्हायला हवा. यासोबतच गृहमंत्र्यांचीही चौकशी झाली पाहिजे. त्यामुळं जोपर्यंत तपास सुरु आहे तोपर्यंत गृहमंत्र्यांनी राजीनामा द्यावा, असं स्पष्ट मत राशीद अल्वी यांनी व्यक्त केलं होतं. राशीद अली यांच्या या वक्तव्यावर आश्चर्य व्यक्त केलं जात होतं. तसंच, राशीद अल्वी यांच्या या भूमिकेमुळं महाविकास आघाडी सरकारमध्ये असलेल्या काँग्रेस पक्ष या प्रकरणात सावध भूमिका घेतोय का अशी चर्चाही रंगली होती. अखेर, काँग्रेसचे नेते यांनी एक ट्विटकरत भूमिका स्पष्ट केली आहे.

अनेकजण कोणत्याही विषयावर आपलं मत व्यक्त करु शकतात. हे त्यांचं वैयक्तिक मत म्हणून त्याकडे पाहिलं गेलं पाहिजे. फक्त प्रदेशाध्यक्ष व प्रवक्त्यांचं मत ही पक्षाची अधिकृत भूमिका म्हणून पाहिलं पाहिजे. राशीद अल्वी काँग्रेसचे अधिकृत प्रवक्ते नाहीत, असं सचिन सावंत यांनी म्हटलं आहे.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here