मुंबई: यांनी गृहमंत्री यांच्यावर केलेले आरोप हे एक सुनियोजित कटकारस्थान आहे. महाविकास आघाडीला आणि गृहमंत्र्यांना बदनाम करण्याचा प्रयत्न त्यांनी केला आहे. ते दिल्लीत कोणा-कोणाला भेटले होते याची माहिती आमच्याकडं आहे. लवकरच सत्य सर्वांसमोर येईल,’ असं सूचक वक्तव्य राज्याचे अल्पसंख्याक मंत्री व राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते यांनी केलं आहे. अनिल देशमुख यांचा तूर्तास राजीनामा घेतला जाणार नाही, असंही त्यांनी स्पष्ट केलं आहे.

मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रात गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या केलेल्या आरोपांमुळं सध्या वाद निर्माण झाला आहे. विरोधक अनिल देशमुख यांच्या राजीनाम्याची मागणी करत आहेत. नवाब मलिक यांनी सिंग यांचे आरोप व विरोधकांच्या टीकेला सडेतोड उत्तर दिलं आहे.

‘परमबीर सिंग यांनी बदली झाल्यावर ही चिठ्ठी लिहिली आहे. १७ मार्चला बदली होणार हे माहीत झाल्यानंतर १६ मार्चला एका पोलीस अधिकाऱ्याशी व्हॉट्सअॅप चॅट करून, त्याला काहीतरी प्रश्न विचारून पुरावा तयार केला. त्या चॅटनुसार गृहमंत्री अनिल देशमुख हे फेब्रुवारीच्या शेवटच्या आठवड्यात वाझेना भेटले असा उल्लेख करण्यात आला आहे. त्याच दरम्यान अनिल देशमुख हे विदर्भाच्या दौऱ्यावर होते. त्याचवेळी त्यांना करोना झाला. १५ दिवस हॉस्पिटलमध्ये, नंतर २७ फेब्रुवारीपर्यंत घरातच विलगीकरणात होते. २७ फेब्रुवारीला त्यांचा रिपोर्ट निगेटिव्ह आला. असं असताना पुरावा तयार करून कटकारस्थान करत बदनाम करण्याचा प्रयत्न होता, असंही नवाब मलिक यांनी म्हटलं आहे.

‘परमबीर सिंग यांनी केलेला आरोप गंभीर आहे याची चौकशी होईल. चौकशीत जे निष्पन्न होईल, त्यानुसार कारवाई करण्यात येईल, असंही मलिक यांनी स्पष्ट केलं आहे.

वाचा:

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here