सुरेश कौलगेकर ।

भाजपचे खासदार व शिवसेनेमधील राजकीय कुरघोड्यांमुळं सतत चर्चेत असलेल्या सिंधुदुर्गात जिल्हा परिषद अध्यक्षपदाची निवडणूक बुधवारी होणार आहे. सांगली व जळगाव महापालिकेमध्ये भाजपला धक्का देऊन महाविकास आघाडीनं घडवलेल्या सत्ता परिवर्तनाच्या पार्श्वभूमीवर ही निवडणूक होत आहे. त्यामुळं या निवडणुकीबद्दल प्रचंड उत्सुकता आहे. इथंही भाजपला व राणेंना धक्का देणार का, याची चर्चा सुरू आहे.

जिल्हा परिषद अध्यक्षपदासाठी २४ मार्च रोजी दुपारी तीन वाजता छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात निवडणूक पार पडणार आहे. सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेचे अध्यक्ष पद मागास (महिला) प्रवर्गासाठी राखीव आहे. तर सिंधुदुर्ग जिल्हा परिषद सदस्य आणि पंचायत समिती सभापती उपस्थित राहणार आहेत.

जिल्हा परिषदेवर सध्या नारायण राणे यांचे वर्चस्व आहे. ५० सदस्यांच्या जिल्हा परिषदेत राणे समर्थकांची संख्या सर्वाधिक आहे. २०१७ च्या निवडणुकीत राष्ट्रीय काँगेस व राष्ट्रवादीच्या तिकिटावर २७ सदस्य, शिवसेनेचे १६ तर भाजप ७ सदस्य निवडून आले होते. परंतु नारायण राणे काँग्रेसमधून भाजपमध्ये गेल्यानंतर जिल्हा परिषदेची सत्ता ताब्यात ठेवण्यात यश मिळवले होते. आता राणे समर्थक असलेल्या भाजपच्या समिधा नाईक यांनी अध्यक्षदाचा राजीनामा दिल्यानं ही निवडणूक होत आहे.

वाचा:

राज्यात शिवसेना-राष्ट्रवादी व काँग्रेस महाआघाडीचे सरकार आहे. २०१७ च्या निवडणुकीत काँग्रेस व राष्ट्रवादीच्या तिकिटावर निवडून आलेले सदस्य नारायण राणे भाजप समर्थक असले तरी पक्षाच्या तिकिटावर निवडून आलेल्या या सदस्यांच्या मदतीनं भाजपला धक्का देण्यासाठी महाविकास आघाडी सज्ज झाली आहे. त्यामुळं सिंधुदुर्गातही सांगली व जळगावची पुनरावृत्ती होते का, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

वाचा:

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here