मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर केलेल्या आरोपांनंतर राज्यातील राजकारण ढवळून निघालं आहे. दिल्लीतही या घडामोडींचे पडसाद उमटत आहेत. केंद्रीय मंत्री रवीशंकर प्रसाद यांनी काल पत्रकार परिषद घेऊन राष्ट्रवादी काँग्रसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर टीका केली होती. राज्यातील सरकारनं गृहमंत्री अनिल देशमुख यांना १०० कोटींच्या वसुलीचे टार्गेट दिलं आहे. मग इतर मंत्र्यांना सरकारने किती वसुली करण्याचे टार्गेट दिलं आहे? उद्धव ठाकरे व शरद पवार गप्प का आहेत,’ असा सवाल त्यांनी केला होता.
वाचा:
रवीशंकर प्रसाद यांच्या टिकेला नवाब मलिक यांनी सडेतोड उत्तर दिलं आहे. ‘रवीशंकर प्रसाद यांनी लोकांना शिकवू नये. भाजप हाय मोरॅलिटीच्या गप्पा मारतो आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यालयात जाऊन सरकारच्या कामाची रिपोर्टींग करतो. संघाची कोणती व्यक्ती घटनात्मक पदावर आहे? त्यांना रिपोर्टिंग करणं ही कोणती मोरॅलिटी आहे? ही कोणती घटनात्मक प्रोसेस आहे,’ असा सवाल मलिक यांनी केला. नैतिकतेवरच बोलायचं असेल तर भाजपवाल्यांनी आधी भूतकाळ आठवावा. गुजरातमधील अधिकाऱ्यांनी जेव्हा तेथील मुख्यमंत्री व गृहमंत्र्यांवर आरोप केले होते, तेव्हा त्यांनी राजीनामा दिला होता का?,’ असा प्रश्नही मलिक यांनी केला.
तोपर्यंत राजीनाम्याचा प्रश्नच उद्भवत नाही!
अनिल देशमुख यांच्यावर झालेल्या आरोपांची पक्षांतर्गत चौकशी केली जाणार आहे. परमबीर सिंग यांच्या पत्राच्या आधारे राजीनाम्याची मागणी केली जात नाही, पण केवळ त्या आधारे राजीनाम्याचा प्रश्नच उद्भवत नाही,’ असं नवाब मलिक यांनी स्पष्ट केलं आहे.
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times