आज दिल्लीत पत्रकारांशी बोलताना शरद पवार यांनी गृहमंत्री अनिल देशमुख रुग्णालयात दाखल असल्याचे दाखवणारे कागदपत्रे दाखवत परमबीर सिंग यांच्या पत्रातील दाव्यावर प्रश्नचिन्ह उभे केले. पवार यांनी म्हटले की, करोनाच्या संसर्गामुळे अनिल देशमुख नागपूरच्या रुग्णालयात ५ ते १५ फेब्रुवारी दरम्यान दाखल होते. त्यानंतर घरीच विलगीकरणात होते. त्यावेळी देशमुख कुठे होते हे स्पष्ट झाले. आरोपांवर कोणती कारवाई करावी, कशी चौकशी करावी याबाबतचा अधिकार मुख्यमंत्र्यांचा असून त्यांनी निर्णय घ्यावा असेही पवार यांनी स्पष्ट केले. परमबीर सिंग यांच्या पत्रानंतर निर्माण झालेला वाद हा राज्यातील सरकार अस्थिर करण्याचा कट असल्याचे त्यांनी सांगितले. परमबीर सिंग यांचे आरोप निराधार, खोटे असल्याचे त्यांनी सांगितले.
वाचा:
:
यांनी गृहमंत्री
यांच्यावर केलेले आरोप हे एक सुनियोजित कटकारस्थान आहे. महाविकास आघाडीला आणि गृहमंत्र्यांना बदनाम करण्याचा प्रयत्न त्यांनी केला आहे. ते दिल्लीत कोणा-कोणाला भेटले होते याची माहिती आमच्याकडं आहे. लवकरच सत्य सर्वांसमोर येईल,’ असं सूचक वक्तव्य राज्याचे अल्पसंख्याक मंत्री व राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते
यांनी केलं आहे. अनिल देशमुख यांचा तूर्तास राजीनामा घेतला जाणार नाही, असंही त्यांनी स्पष्ट केलं आहे.
वाचा:
दरम्यान, रविवारी शरद पवार यांच्या दिल्लीतील निवासस्थानी राष्ट्रवादीच्या नेत्यांची बैठक पार पडली. जवळपास अडीच तास ही बैठक पार पडली. त्यानंतर माध्यमांशी चर्चा करताना राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी अनिल देशमुख यांच्या राजीनाम्याचा प्रश्न उद्भवत नसल्याचे स्पष्ट केले होते
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times