बोगस तृतीयपंथी असल्याच्या संशयावरून तृतीयपंथीयांनी दोन तरुणांना निर्वस्त्र करून त्यांचे मुंडन केल्याची घटना घडली. त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली. या प्रकरणी तरुणांच्या तक्रारीवरून बडनेरा पोलिसांनी चार तृतीयपंथीयांविरोधात गुन्हा नोंदविला.
काही तृतीयपंथीयांनी तरुणांना निर्वस्त्र केले. तसेच त्यांचे मुंडन केले. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओत हा सर्व प्रकार दिसत आहे. या तरुणांना नृत्य करण्यासाठी बोलावले. त्यानंतर निर्वस्त्र करून त्यांचे मुंडन केले. या तरुणांनी या प्रकरणाची तक्रार पोलीस ठाण्यात केली. त्यामुळे तृतीयपंथीयांच्या व्यवसायातील असली-नकलीचा वाद पुन्हा शनिवारी दुपारी पोलीस आयुक्त कार्यालयापर्यंत पोहोचला.
तृतीयपंथीयांच्या भीतीने दोन तरुणांनी शनिवारी दुपारी २ वाजताच्या सुमारास पोलीस आयुक्त कार्यालयात आसरा घेतला. परंतु त्याचवेळी त्यांचा पाठलाग करीत ऑटोतून २५ ते ३० तृतीतपंथी पोलीस आयुक्त कार्यालयात पोहोचले. त्यामुळे तेथे प्रचंड गोंधळ उडाला. तृतीयपंथीयांनी घडलेली सर्व हकिकत पोलिसांना सांगितली. त्या तरुणांनीही त्यांच्यासोबत घडलेल्या गंभीर प्रकाराचे कथन पोलिसांसमोर केले. फ्रेजरपुरा पोलिसांनी तरुणांनाही ताब्यात घेतले. व्हिडिओ व्हायरल केल्याप्रकरणी तृतीयपंथीयांविरोधात गुन्हा नोंदविला असून तपास सुरू आहे. पुढील कारवाई सुरू असल्याची माहिती बडनेराचे पोलीस निरीक्षक बबन पुसाटे यांनी दिली.
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times