मुंबई: राज्याच्या राजकारणातील भूकंपाचे केंद्र ठरलेल्या मनसुख हिरन हत्या प्रकरणाचा उलगडा झाल्याचा दावा दहशतवाद विरोधी पथकाचे (एटीएस) उपमहानिरीक्षक शिवदीप लांडे यांनी केला आहे. लांडे यांनी फेसबुकवर यासंदर्भात एक पोस्ट केलीय. त्या पोस्टमध्ये त्यांचा सॅल्यूट ठोकणारा एक फोटो दिसत आहे. अतिसंवेदनशील असलेल्या मनसुख हिरन हत्या प्रकरणात ‘एटीएस’ने एका निलंबित पोलिसासह दोघांना अटक केली आहे. या फेसबुक पोस्टमुळं शिवदीप लांडे कोण आहेत याविषयी चर्चा सुरु झाली आहे.

शिवदीप लांडे यांची फेसबुक पोस्ट

‘अतिसंवेदनशील मनसुख हिरन हत्या प्रकरणाचा उलगडा झाला आहे. मी आमच्या राज्य दहशतवाद विरोधी पथकाच्या सर्व सहकाऱ्यांना सॅल्यूट करतो. त्यांनी गेले काही दिवस रात्रीचा दिवस केला आहे. त्यामुळे या प्रकरणात न्यायपूर्ण परिणाम समोर आला आहे. हे प्रकरण माझ्या संपूर्ण पोलिस कारकिर्दीतील सर्वात जटील प्रकरणांपैकी एक आहे, असं त्यांनी आपल्या फेसबुक पोस्टमध्ये लिहलं आहे.

कोण आहेत शिवदीप लांडे?

शिवदीप लांडे यांचं मुळ गाव विदर्भातील अकोला जिल्ह्यातील आहेत. एटीएसमध्ये DIG असणारे लांडे यांनी कोट्यावधी रुपयांचे ड्रग्सचा तपास केला होता. शिवदीप लांडे यांनी त्यांची कारकिर्दीची सुरुवात बिहारमधील नक्षलग्रस्त भागातून केली होती. त्यानंतर पटना येथे त्यांची पोलीस अधिक्षक म्हणून बदली करण्यात आली होती.

२०११मध्ये शिवदीप लांडे यांनी पटना येथून हटवण्यात आलं होतं. त्यानंतर त्यांची अररिया येथे पोलीस अधीक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली. शिवदीप लांडे यांच्या बदलीच्या विरोधात तरुणांनी व विद्यार्थ्यांनी राज्य सरकारच्या विरोधात आंदोलन केलं होतं. शिवदीप लांडे यांना पटनामध्ये रॉबिनहूड म्हणून ओळखलं जात होत. दरम्यान, शिवदीप लांडे महाराष्ट्रात परतल्यानंतर त्यांना मुंबईत अँटी नार्कोटिक्स विभागाची जबाबदारी देण्यता आली होती. अलीकडेच त्यांनी मनसुख हिरन यांच्या हत्या प्रकरणाचा तपास पूर्ण झाल्याचा दावा त्यांनी केला आहे.

शिवसेनेसोबत कनेक्शन

महाराष्ट्रातील दबंग पोलीस अधिकारी शिवदीप लांडे हे शिवसेनेचे नेते विजय शिवतारे यांचे जावई आहेत. विजय शिवतारे यांची कन्या डॉक्टर ममता शिवतारे यांच्याशी शिवदीप लांडे यांनी लग्न केलं आहे. विजय शिवतारे यांनी महाराष्ट्र सरकारमध्ये जल संसाधन राज्यमंत्री हे पद भूषवलं होतं. तसंच, त्यांची शिवसेनेचे प्रवक्ते म्हणूनही नियुक्ती करण्यात आली होती. मात्र, २०१९ च्या विधानसभा निवडणुकांमध्ये काँग्रेसच्या संजय जगताप यांनी शिवतारे यांना पराभूत केलं होतं.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here