मुंबई: मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांच्या लेटरबॉम्बनं राजकीय वर्तुळात खळबळ माजली आहे. महाविकास आघाडीचे शिल्पकार म्हणून शरद पवारांना श्रेय दिलं जातं. या सर्व घडामोडींनंतर हे सरकारच्या बचावासाठी मैदानात उतरले असून त्यांनी अनिल देशमुखांची पाठराखण केली आहे. तर, एकीकडे विरोधी पक्ष नेते यांनी शरद पवारांचा दावा खोडून काढला आहे.

आज दिल्लीत पत्रकारांशी बोलताना शरद पवार यांनी गृहमंत्री रुग्णालयात दाखल असल्याचे दाखवणारे कागदपत्रे दाखवत परमबीर सिंग यांच्या पत्रातील दाव्यावर प्रश्नचिन्ह उभे केले. पवार यांनी म्हटले की, करोनाच्या संसर्गामुळे अनिल देशमुख नागपूरच्या रुग्णालयात ५ ते १५ फेब्रुवारी दरम्यान दाखल होते. त्यानंतर घरीच विलगीकरणात होते. त्यामुळं सचिन वाझे आणि अनिल देशमुख यांच्यात बैठक झाली असल्याचा दावाच चुकीचा असल्याचे पवार यांनी म्हटले होते. त्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी शरद पवारांनी दिलेल्या स्पष्टीकरणावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे. पवारांची पत्रकार परिषद संपताच फडणवीस यांनी दोन ट्वीट केले आहेत.

१५ ते २७ फेब्रुवारी या कालावधीत अनिल देशमुख होम क्वारंटाइन होते, असं पवा साहेब सांगतात. पण १५ फेब्रुवारीला सुरक्षारक्षकांसह, माध्यम प्रतिनिधींसमोर अशी पत्रकारपरिषद मात्र झाली होती. मग हे नेमके कोण?, असा सवाल देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे.

परमवीर सिंग यांच्या पत्रावर श्री शरद पवार यांना पुरेशी माहिती देण्यात आलेली नाही, असे स्पष्टपणे दिसून येते. या पत्रात नमूद केलेला ‘एसएमएस’चा पुरावाच सांगतो की, ही भेट फेब्रुवारीच्या अखेरीस झालेली आहे. आता नेमके कोण दिशाभूल करते आहे?, असंही देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here