ट्विटवर ट्विट करत डॉ. वाघमारे यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर हा हल्लाबोल केला आहे. भाजपच्या २२ मंत्र्यांवर पुराव्यानिशी आरोप करण्यात आले होते. मग या २२ मंत्र्यांपैकी कोणी राजीनामा दिला?, असा सवाल डॉ. वाघमारे यांनी विचारला आहे. अमित शहा यांच्या काळात पुलवामा घडले. त्यावेळी शहा यांनी राजीनामा दिला का?, भाजपच्या सर्व मंत्र्यांचे न्यायाधीश फडणवीस कसे झाले होते?… भाजपने 2014 पासून त्यांच्या खडसे सोडून कोणत्या मंत्र्यावर आरोप झाल्यावर चौकशी लावली?, असे प्रश्नावर प्रश्न डॉ. वाघमारे यांनी विचारले आहेत.
वनमंत्री संजय राठोड यांच्यावर झालेल्या आरोपानंतर राठोड यांना तातडीने पायउतार व्हावे लागले. मात्र, गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर एका उच्चपदस्थ अधिकाऱ्याने आरोप केल्यानंतर त्यांचा राजीनामाा का घेतला नाही, असा प्रश्न भाजपने उपस्थित केला होता. त्यावर डॉ. राजू वाघमारे यांनी वरील उत्तर दिले आहे.
क्लिक करा आणि वाचा-
डॉ. वाघमारे पुढील ट्विटमध्ये म्हणतात की, १५ फेब्रुवारी रोजी अनिल देशमुख यांची पत्रकार परिषद झाली हे खरे. परंतु ती त्यांना डिस्चार्ज मिळाला त्या दिवशीच हॉस्पिटलच्या आवारात झाली. खोटे बोलून संभ्रम तयार करायचा… सत्ता गेल्यावर काही माणसांचे संतुलन कसे बिघडते याचे उत्तम उदाहरण म्हणजे फडणवीस.भाजप नेत्यांनी हे कृपा करून तपासून घ्यावे.
क्लिक करा आणि वाचा-
परमवीर सिंग यांचा लेटर बॉम्ब फुसका, असल्याचे वाघमारे यांनी म्हटले आहे. फेब्रुवारीत सचिन वाझे आणि अनिल देशमुख यांच्या भेटीची शंका! आणि भेट जरी झाली तरी १०० कोटींच्या वसुलीची बातमी खरी कशी? फक्त अधिकारी पत्र देतो म्हणून मंत्री राजीनामा देणार?, असे सवालही त्यांनी विचापले आहेत. गुन्हा हा जिलेटीन कार आणि मनसुख हिरेन मृत्यू तपास भरकटवून सिंग!आता भाजप स्वतःचे तोंड काळे करतील का? असा टोलाही त्यांनी भाजपला लगावला आहे.
क्लिक करा आणि वाचा-
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times