सांगली: प्रसिद्ध उद्योगपती आणि चितळे उद्योगसमूहाचे आधारस्तंभ समजले जाणारे काकासाहेब चितळे यांचे हृदयविकाराच्या झटक्याने आज निधन झाले. ते ७८ वर्षांचे होते.

सुप्रसिद्ध चितळे डेअरी ही दुग्धोत्पादक संस्था सांगलीतील पलूस तालुक्यातील भिलवडी गावात १९३९ मध्ये सुरू झाली. भास्कर चितळे यांनी हा व्यवसाय सुरू केला होता. त्यांच्यासोबतीला दुसऱ्या पिढीतीले भाऊसाहेब व काकासाहेब चितळे यांनी हा व्यवसाय आणखी वृ्द्धीगंत केला. यांनी १९५० मध्ये या कंपनीची स्थापना केली.

आधुनिक तंत्रज्ञानाच्या आधारे चितळे बंधूंनी व्यवसाय आणखी वाढवला. व्यवसाय फक्त डेअरीपुरता मर्यादित न ठेवता दूध, दही, लोणी, तूप, श्रीखंडासोबतच लाडू, मोदक, करंज्या व बर्फी आदी पदार्थ बाजारात आणले. चितळ्यांच्या खमंग बाकरवडीची चव सातासमुद्रापारापलीकडे गेली आहे. तीन वर्षांपूर्वी काकासाहेब यांचे ज्येष्ठ बंधू रघुनाथराव चितळे यांचे निधन झाले होते. काकासाहेब चितळे हे सध्या सांगलीतील भिलवडी येथील चितळे डेअरीचे कामकाज पाहात होते.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here