करोनाच्या संसर्गामुळे अनिल देशमुख रुग्णालयात ५ ते १५ फेब्रुवारी दरम्यान दाखल होते. त्यानंतर घरीच विलगीकरणात होते. त्यामुळं सचिन वाझे आणि अनिल देशमुख यांच्यात बैठक झाली असल्याचा दावाच चुकीचा असल्याचे पवार यांनी म्हटले होते. मात्र, भाजपच्या नेत्यांनी पवारांच्या वक्तव्यावर आक्षेप घेत राष्ट्रवादी काँग्रेसवर टीका केली आहे.
‘अनिल देशमुखांना वाचवायचचं असा निर्णय राष्ट्रवादीने घेतलेला दिसतोय. १५ फेब्रुवारीला देशमुखांनी पत्रकार परिषद घेतली होती. क्वारंटाइन काळात घेता येते? कितीही झाकलं तरी सत्य लपणार नाही! “ये पब्लिक है, ये सब जानती है!,’ असं प्रवीण दरेकर यांनी म्हटलं आहे.
‘स्वत:ची चामडी वाचवण्यासाठी पवार साहेबांसारख्या ज्येष्ठ नेत्याला या वयात आणखी किती सारवासारव करायला भाग पाडणार आहात? थोडा त्यांच्या ज्येष्ठतेचा तरी विचार करा,’ असा खोचक टोला त्यांनी लगावला आहे.
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times