मुंबई: प्रकरणाचा उलगडा करण्यात आल्याचा दावा करणाऱ्या दहशतवाद विरोधी पथकाने (एटीएस) या प्रकरणात आणखी एकाला अटक केली आहे. ही या प्रकरणातील तिसरी अटक आहे. एटीएसने काल या प्रकरणात दोघांना अटक केली होती. त्यात एका निलंबित पोलीस कर्मचाऱ्याचा समावेश होता.
मनसुख हिरन मृत्यू प्रकरणाचा तपास एनआयएकडे सोपवण्यात आला असला तरी, या प्रकरणात महाराष्ट्र एटीएसकडूनही तपास सुरू आहे. काल एका निलंबित पोलीस कॉन्स्टेबलसह बुकीला अटक केल्यानंतर आज, एटीएसच्या पथकाने एकाला गुजरात येथून ताब्यात घेतले आहे. मनसुख हिरन प्रकरणातील ही तिसरी अटक आहे. १४ सिम कार्ड पुरवण्याच्या आरोपाखाली त्याला ही अटक केली आहे.
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times