नागपूर: नागपूरात गेल्या काही दिवसांपासून रुग्णसंख्या ३ हजारांच्यावर जात आहे. गेल्या २४ तासांत नागपुरात ३ हजार ५९६ नवीन रुग्ण सापडले आहेत. तर, ४० करोना बाधितांचा मृत्यू झाला आहे.

वाढता करोना संसर्ग आटोक्यात आणण्यासाठी निर्बंध कडक करण्यात आल्यानंतरही रुग्णवाढ कायम असल्यानं चिंता वाढली आहे. नागुपरात दिवसाला रुग्णवाढ साडे तीन हजारांच्या पार जात असल्यानं रुग्ण संख्या नियंत्रणात आणण्याचे मोठे आव्हान आरोग्य प्रशासनासमोर उभं राहिलं आहे.

नागपुरात आज सापडलेल्या रुग्णसंख्येनं चिंता अधिक वाढली आहे. त्यामुळं नागपुरात अधिक निर्बंध कडक करण्यात येणार का अशी शंका व्यक्त करण्यात येत आहे. आज दिवसभरात ३ हजार ५९६ रुग्ण सापडल्यानं एकूण रुग्णसंख्या १ लाख ९६ हजार ६७६ इतकी झाली आहे. तर, आज दिवसभरात १ हजार ८३७ इतक्या रुग्णांनी करोनावर मात केली आहे. त्यामुळं बरे होणाऱ्या रुग्णांची एकूण संख्या १ लाख ६० हजार ९४५ इतकी झाली आहे.

गेल्या २४ तासांत ४० जणांनी उपचारादरम्यान आपले प्राण गमावले आहेत. त्यामुळं एकूण मृतांची संख्या ४ हजार ६६४ इतकी झाली. तर, सध्या नागपुरात ३१ हजार ०६७ इतके सक्रीय रुग्ण असून त्यांच्यावर उपचार सुरु आहे.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here