कोंढवा पोलीस ठाण्यात संशयित २८ वर्षीय तरुणाविरोधात गुन्हा दाखल केला आहे. तो लष्कर परिसरातील राहणारा आहे. एका जीममध्ये तो ट्रेनर म्हणून काम करत होता. १९ वर्षीय मुलीने त्याच्याविरोधात विनयभंग केल्याची तक्रार दाखल केली आहे.
आरोपी तरूण हा कोंढवा परिसरातील एका जीममध्ये ट्रेनर म्हणून काम करत आहे. त्याच जीममध्ये तरुणीही जात होती. काही दिवसांनी त्या दोघांमध्ये ओळख झाली. या तरुणीला बॉक्सिंग शिकायचे होते. त्यावर तरुणाने बॉक्सिंग शिकवण्याचा बहाणा केला आणि तो तिला बॉक्सिंग शिकवण्यासाठी घरी जाऊ लागला. शुक्रवारी तो बॉक्सिंग शिकवण्याच्या बहाण्याने तिच्या घरी गेला. तिचा विनयभंग केला. त्यावर पीडितेने त्याला विरोध केला. त्यानंतर पीडितेने कोंढवा पोलीस ठाण्यात आरोपीविरोधात तक्रार दाखल केली. या तक्रारीवरून पोलिसांनी तरुणाविरोधात गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास सुरू आहे, असे पोलीस सूत्रांनी सांगितले.
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times