गोकुळ दूध संघावर सध्या माजी आमदार महादेवराव महाडिक व आमदार पी. एन. पाटील यांची सत्ता आहे. महाडिक हे भाजपचे तर पाटील हे काँग्रेसचे निष्ठावंत आहेत. त्यांच्या विरोधात पालकमंत्री पाटील यांनी आघाडी स्थापन केली आहे. महाविकास आघाडीच्या माध्यमातून ही निवडणूक लढविली जाईल अशी घोषणा करताना ते म्हणाले, दुधाला चार पैसे जादा दर मिळावा यासाठीच आम्ही या निवडणुकीत उतरलो आहोत. भाजप वगळता इतर सर्व पक्ष आमच्या सोबत आहेत. राष्ट्रवादी, शिवसेना, जनसुराज्य शक्ती सोबत असल्याने आमची ताकद वाढली आहे. दोन दिवसात निवडणूक जाहीर होण्याची शक्यता आहे. पुढील आठवड्यात जागा वाटप होईल.
मंत्री मुश्रीफ यांनी सांगितले की, गेल्या निवडणुकीत आम्ही सत्ताधारी आघाडीसोबत होतो. विधानसभा निवडणुकीत त्यांनी मदत केल्यानेच त्यांना पाठिंबा दिला. संघ मल्टिस्टेट करण्याच्या निर्णयाला विरोध करत आम्ही त्या आघाडीतून बाहेर पडलो.
आमदार विनय कोरे म्हणाले, दूध संघाच्या निवडणुकीत आम्ही महाविकास आघाडीसोबत आहे. पण, राज्याच्या राजकारणात आम्ही भाजपचा घटक पक्ष म्हणूनच असू. गोकुळमध्ये चारवेळा आम्ही सत्ताधारी आघाडीविरोधात लढलो आहोत. आता आमच्या लढाईला बळ मिळाले आहे.
महाविकास आघाडी म्हणून विरोधी पॅनेलची घोषणा करण्यात आली. पण, या पॅनेलमध्ये काँग्रेसचे आमदार पी. एन. पाटील नाहीत. ते सत्ताधारी आघाडीचे नेतृत्व करत आहेत. याबाबत सतेज पाटील यांना विचारले असता ते म्हणाले, त्यांना सोबत घेण्याचा आम्ही प्रयत्न केला. मंत्री हसन मुश्रीफ यांच्या सोबत अनेक बैठका झाल्या. त्यांनी नकार दिल्याने तो प्रश्न संपला आहे.
शाहू शेतकरी आघाडीतील नेते
ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ, गृहराज्यमंत्री सतेज पाटील, खासदार प्रा. संजय मंडलिक, खासदार धैर्यशील माने, राज्यमंत्री राजेंद्र पाटील यड्रावकर, आमदार विनय कोरे, आमदार प्रकाश आबिटकर, आमदार राजेश पाटील, माजी आमदार चंद्रदीप नरके, सत्यजित पाटील, के.पी. पाटील, ए.वाय. पाटील, अरूण डोंगळे, विश्वास नारायण पाटील, जयश्री पाटील चुयेकर, जयवंत शिंपी, गोपाळराव पाटील, प्रताप माने.
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times