मुंबई: राज्यात गेल्या काही दिवसांपासून धडकी भरवणारा बाधित रुग्णांचा () आकडा समोर येत असताना आज किंचितसे का होईना, पण दिलासादायक चित्र आहे. आज राज्यात तुलनेने नव्या रुग्णांची संख्या थोडीशी घटली आहे. आज गेल्या २४ तासांत राज्यात २४ हजार ६४५ नव्या रुग्णांचे निदान झाले आहे. काल ही संख्या ३० हजार ५३५ इतकी होती. कालच्या तुलनेत ही घट ५ हजार ८९० ने कमी आहे. या बरोबरच, गेल्या २४ तासांमध्ये एकूण १९, हजार ४६३ करोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले. काल ही संख्या ११ हजार ३१४ इतकी होती. याबरोबरच राज्यातील सक्रिय रुग्णांची संख्या २ लाख १५ हजार २४१ वर जाऊन पोहचली आहे. ( Coronavirus In Maharashtra Latest updates)

आज राज्यात एकूण ५८ करोना बाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. काल ही संख्या ९९ इतकी होती. सध्या राज्यातील मृत्यूदर २.१३ टक्के इतका आहे. राज्यात आज १९ हजार ४६३ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत, तर आतापर्यंत एकूण २२ लाख ३४ हजार ३३० रुग्ण बरे झाले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ८९.२२ टक्क्यांवर आले आहे.

पुणे जिल्ह्यात सर्वाधिक सक्रिय रुग्ण
राज्यातील अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या २ लाख १५ हजार २४१ इतकी झाली आहे. पुणे जिल्ह्यात सर्वाधिक ३९ हजार ४९२ इतरे रुग्ण आहेत तर नागपूर जिल्ह्यातील आकडा वाढून तो ३१ हजार ४२९ इतका झाला आहे. मुंबई पालिका हद्दीत हा आकडा २३ हजार ६७१ इतका आहे. तर ठाणे जिल्ह्यात सध्या २० हजार ६६३ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

या बरोबरच नाशिकमध्ये सक्रिय रुग्णांची संख्या १६ हजार ०३५ इतकी आहे. अमरावतीत ही संख्या ३ हजार ७३६, औरंगाबादमध्ये १४ हजार ०८७, जळगावमध्ये ६ हजार ५३१, अहमदनगरमध्ये ४ हजार ५९६ इतकी आहे. तर, कोल्हापुरात सक्रिय रुग्णांची संख्या ५६१ इतकी आहे. राज्यात सर्वात जास्त सक्रिय रुग्णांची संख्या पुण्यात आहे. तर, सर्वात कमी सक्रिय रुग्णांची संख्या गडचिरोली जिल्ह्यात आहे. येथे सक्रिय रुग्णांची संख्या २९७ इतकी आहे.

१०,६३,०७७ व्यक्ती होम क्वारंटाइन

आतापर्यंत तपासण्यात आलेल्या १ कोटी ८४ लाख ६२ हजार ०३० प्रयोगशाळा नमुन्यांपैकी २५ लाख ०४ हजार ३२७ (१३.५६ टक्के ) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात १० लाख ६३ हजार ०७७ व्यक्ती होमक्वारंटाइनमध्ये आहेत. तर, ११ हजार ०९२ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाइनमध्ये आहेत.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here