पालघर: राज्यात करोनाचे रुग्ण वेगाने वाढत आहेत. अनेक जिल्ह्यांत संसर्गाने पुन्हा एकदा थैमान घातले आहे. ही करोनाची दुसरी लाट असल्याचे सरकारनेही मान्य केले असून त्यादृष्टीने लॉकडाऊन सारखा कठोर निर्णय घेण्याचे संकेतही मिळू लागले आहेत. असे असतानाच होळीबाबत मुंबईजवळच्या जिल्ह्याने अत्यंत महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. असा निर्णय राज्यभरासाठीही घेतला जाऊ शकतो, असे बोलले जात आहे. ( )

वाचा:

शहरात दैनंदिन रुग्णसंख्येचा स्फोट झाला असताना मुंबईला लागून असलेल्या आणि पालघर जिल्ह्यातील करोना बाधितांचा आकडाही वेगाने वाढत आहे. ही बाब लक्षात घेऊन प्रशासन सतर्क झालं आहे. त्यातूनच सणाबाबत पालघर जिल्हा प्रशासनाने आतापासूनच मोठं प्रतिबंधात्मक पाऊल उचललं आहे. पालघर जिल्ह्यात होळीबाबत मनाई आदेश जारी करण्यात आला आहे.

वाचा:

प्रशासनाच्या आदेशानुसार पालघर जिल्ह्यात सार्वजनिक ठिकाणी तसेच हॉटेल्स आणि रिसॉर्टवर होळी सेलिब्रेशन करण्यास बंदी घालण्यात आली आहे. येत्या २८ मार्च रोजी होळी पौर्णिमा आहे तर २९ मार्च रोजी धूलिवंदन आहे. यादरम्यान कोणत्याही प्रकारे एकत्र येऊन सेलिब्रेशन करण्यास जिल्ह्यात मनाई राहणार आहे. पालघर जिल्ह्यात बीचेस तसेच रिसॉर्ट मोठ्या प्रमाणात आहेत. या सर्व ठिकाणी होळी सेलिब्रेशनसाठी मोठी गर्दी होत असते. मुंबईतून मोठ्या प्रमाणात लोक ग्रुपने तसेच कुटुंबासह येथे येऊन होळी साजरी करत असतात. ही बाब लक्षात घेऊनच जिल्हा प्रशासनाने प्रतिबंधात्मक पाऊल टाकले आहे. बंदी आदेश मोडला गेल्यास आपत्ती व्यवस्थापन कायदा, महाराष्ट्र कोविड १९ नियम तसेच भारतीय दंड विधानाच्या कलम १८८ अन्वये कारवाई करण्यात येईल, असा इशाराही आदेशात देण्यात आला आहे.

वाचा:

दरम्यान, पालघर जिल्ह्यातील शहरी आणि ग्रामीण भागात गेल्या काही दिवसांपासून करोनाचे रुग्ण वेगाने वाढत आहेत. या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील सर्व विद्यार्थी वसतिगृहे आजपासून बंद करण्यात आली आहेत. पालघर जिल्ह्यात आतापर्यंत करोनाचे एकूण ४७ हजार ६६ रुग्ण आढळले असून ४५ हजार २९८ रुग्णांनी करोनावर मात केली आहे तर १२०९ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. आज जिल्ह्यात नवीन १२० रुग्णांची भर पडली असून सध्या १ हजार १५९ अॅक्टिव्ह रुग्ण आहेत.

वाचा:

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here