मुंबई/ : शहर आणि लगतच्या ठाणे जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून करोनाचा पुन्हा एकदा कहर पाहायला मिळत आहे. रुग्णसंख्येत सातत्याने मोठी वाढ होताना दिसत आहे. मुंबईत गेल्या २४ तासांत ३ हजार २६० नवीन रुग्णांची भर पडली आहे तर ठाणे जिल्ह्यात सलग दुसऱ्या दिवशी दोन हजारांपेक्षा अधिक नवीन रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे करोना नियंत्रणात आणण्यासाठी या दोन्ही जिल्ह्यांत पुन्हा एकदा लॉकडाऊन सारखे कठोर पाऊल उचलले जाणार का, हा प्रश्न चर्चिला जाऊ लागला आहे. ( )

वाचा:

मुंबईवरील करोनाचा विळखा पुन्हा एकदा घट्ट होऊ लागला आहे. गेले काही दिवस रुग्णसंख्येचा ग्राफ चढाच आहे. आज मुंबईत ३ हजार २६० नवे बाधित आढळले तर १ हजार ३२३ रुग्ण बरे होऊन घरी परतले. दिवसभरात १० बाधितांचा मृत्यू झाला. मुंबईतील अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या सध्या २५ हजार ३७२ इतकी असून आतापर्यंत या संसर्गाने ११ हजार ५९२ इतक्या रुग्णांचा बळी घेतला आहे. मुंबईत दादर, माहीम आणि या भागातही मोठी रुग्णवाढ पाहायला मिळत आहे. आज धारावीत ४०, दादरमध्ये ५७ तर माहीममध्ये ७१ अशी एकूण १६८ नवीन रुग्णांची भर पडली.

वाचा:

ठाणे जिल्ह्यातही धोका वाढला

ठाणे जिल्ह्यात सलग आज दुसऱ्या दिवशी दोन हजारांहून अधिक नवीन करोना बाधित रुग्ण आढळले असून एकूण २ हजार १७३ रुग्णांची भर पडली आहे. दिवसभरात ठाणे, आणि नवी मुंबईमध्ये दैनंदिन रुग्णांच्या संख्येतही मोठ्या प्रमाणावर वाढ झाली असून अनुक्रमे ५९०, ६८६ आणि ४०४ रुग्ण आढळून आले आहेत. तर मिरा-भाईंदरमध्ये १३१, उल्हासनगर ५१, भिवंडी ३९, अंबरनाथ ९६, बदलापूर ११२ आणि ठाणे ग्रामीणमध्ये आढळलेल्या नवीन रुग्णांची संख्या ६४ आहे. जिल्ह्यातील करोना रुग्णांचा आलेख झपाट्याने वाढू लागला असून आतापर्यंत जिल्ह्यातील बाधितांची एकूण संख्या २ लाख ९० हजार ६१६ इतकी झाली आहे. तर सोमवारी १ हजार ११७ रुग्ण करोनामुक्त झाले. त्यामुळे बरे झालेल्या रुग्णांचा आकडा वाढत २ लाख ६७ हजार ६७४ वर गेला आहे. सध्या १६ हजार ५५० रुग्ण उपचार घेत आहेत. तर दिवसभरात १० रुग्णांचा करोनामुळे मृत्यू झाला असून करोनाबळीचा आकडा ६ हजार ३९२ इतका झाला आहे.

वाचा:

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here