मुंबई: वंचित बहुजन आघाडीचे नेते (Prakash Ambedkar) यांनी मनसुख हिरन (Mansukh Hiren) मृत्यू प्रकरण, तसेच अनिल देशमुख (Anil Deshmukh) प्रकरणी आपले म्हणणे मांडण्यासाठी आज राज्यपाल (Bhagat Singh Koshyari) यांची भेट घेतली. या वेळी त्यांनी राज्यपालांना एक निवेदन सादर केले. हे सरकार बरखास्त करावे अशी मागणी त्यांनी राज्यपालांकडे केली. या भेटीनंतर त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याबाबतही आपले मत व्यक्त केले आहे. ( should be dismissed demands to the )

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीकास्त्र सोडताना आंबेडकर म्हणाले की, मुख्यमंत्र्यांना कणा नसल्याचे हे त्यांनी पुन्हा एकदा दाखवून दिले आहे. शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी वाचून बोलावे लिहून बोलू नये.

या वेळी त्यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याबाबतही व्यक्तव्य केले. गृहमंत्री अनिल देशमुख प्रकरणात राज्यपालांनी आपला अहवाल राष्ट्रपतींना पाठवला पाहिजे. जर त्यांनी तो पाठवला नाही, तर मी असे समजेल की राज्यपाल ज्या पक्षाचे आहेत तो पक्षही या प्रकरणात सामील आहे, असे आंबेडकरा म्हणाले.

क्लिक करा आणि वाचा-
मनसुख हिरेन प्रकरण असो किंवा मग गृहमंत्री अनिल देशमुख प्रकरण असो, राज्य सरकारकडून या प्रकरणांची निष्पक्ष चौकशी होणार नाही. हे लक्षात घेत हे सरकार बरखास्त करण्यात यावे. मात्र सभागृह बरखास्त करू नये, अशी मागणी आंबेडकर यांनी आपल्या निवेदनाद्वारे केली.

राज्यात गेल्या काही महिन्यांमध्ये झालेले हाय प्रोफाइल लोकांचे मृत्यू या सर्व आत्महत्या असल्याचे दाखवण्यात आले आहे. या मृत्यू प्रकरणाची योग्य ती चौकशी झालेली नाही. अशी परिस्थिती असताना वाझे प्रकरण उघडकीस आले. या प्रकरणात गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर १०० कोटी रुपये वसुलीचा आरोप करण्यात आला. हा आरोप करणारे मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी केला आहे, असे नमूद करताना हे रुपये वसूल करण्याचा निर्णय पक्ष स्तरावर घेण्यात आला आहे की कॅबिनेट स्तरावर याची निष्पक्ष चौकशी झाली पाहिजे, अशी मागणी प्रकाश आंबेडकर यांनी केली आहे.

क्लिक करा आणि वाचा- क्लिक करा आणि वाचा-

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here