मुंबई: मुंबईचे माजी पोलीस आयुक्त यांनी लेटरबॉम्ब टाकल्यानंतर गेले दोन दिवस ज्ञानेश्वरी या आपल्या शासकीय निवासस्थानातूनच ट्वीट, प्रसिद्धीपत्रक आणि व्हिडिओ संदेश या माध्यमातून व्यक्त होणारे राज्याचे गृहमंत्री आज रात्री अचानक अतिथीगृहावर पोहचले. तिथे ते नेमके कुणाला भेटले?, याबाबत अद्याप कोणताही तपशील मिळू शकलेला नाही. ( )

वाचा:

गृहमंत्री अनिल देशमुख हे रात्री पावणेआठच्या सुमारास सह्याद्री अतिथीगृहावर पोहचले. ते जवळपास तीन तास अतिथीगृहावर होते. त्यानंतर ते ११ वाजताच्या सुमारास आपल्या ज्ञानेश्वरी या निवासस्थानी परतले. ते सह्याद्रीवर नेमके कुणाला भेटले, याचा तपशील मात्र मिळू शकला नाही. माध्यमांचे प्रतिनिधी मोठ्या प्रमाणात सह्याद्रीबाहेर जमा झाले होते. मात्र, देशमुख माध्यमांपासून दूर राहिले. पोलीस तसेच सुरक्षा ताफ्याच्या गराड्यातच देशमुख तिथून निघून गेले. त्यामुळे या सह्याद्री भेटीवरून अनेक तर्क काढले जाऊ लागले आहेत.

वाचा:

दरम्यान, अनिल देशमुख यांनी यांना दरमहा १०० कोटी रुपयांची वसुली करण्याचे टार्गेट दिल्याचा गंभीर आरोप करणारं पत्र परमबीर सिंग यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांना लिहिल्याने खळबळ माजली आहे. हे सर्व आरोप फेटाळत देशमुख यांनी परमबीर यांच्याविरुद्ध कोर्टात अब्रूनुकसानीचा दावा दाखल करणार असे सांगितले आहे. त्याचवेळी परमबीर सिंग हे सुद्धा आरोपावर ठाम असून त्यांनी आता थेट सुप्रीम कोर्टात धाव घेतली आहे. मी मुख्यमंत्र्यांना दिलेल्या पत्रात जे आरोप केले आहेत त्यांची सीबीआयमार्फत चौकशी करण्यात यावी, अशी मागणी परमबीर यांनी आपल्या याचिकेत केली आहे.

वाचा:

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here