तरनतारन: पंजाबमधील तरनतार जिल्ह्यात शनिवारी झालेल्या एका कार्यक्रमात फटाक्यांचा भीषण स्फोट झाला. या स्फोटात २ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. तर, ११ जण जखमी झाले आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नगर कीर्तन (धार्मिक मिरवणूक)दरम्यान एका ट्रॅक्टर-ट्रॉलीवरून फटाके नेण्यात येत होते.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नगर कीर्तन दरम्यान सहभागी झालेल्या भाविकांकडून फटाके फोडण्यात येत होते. ट्रॅक्टर ट्रॉलीवर मोठ्या प्रमाणावर फटाके ठेवण्यात आले होते. या दरम्यान ट्रॅक्टर-ट्रॉलीवर ठेवण्यात आलेल्या फटाक्यांच्या साठ्यावर ठिणगी पडली. त्यामुळे हा स्फोट झाला असल्याची माहिती पोलिसांनी दिली. दरम्यान, या घटनेचा तपास पोलिसांनी सुरू केला आहे. या स्फोटातील जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तरनतारन हा भारत पाकिस्तान सीमेवरचा जिल्हा आहे.
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times