हैदराबादः करोनावरील लस वाया जाण्याबाबत (Worst rate) तेलंगण आघाडीवर आहे, असं केंद्र सरकारने म्हटलं आहे. यावरून तेलंगण सरकारने अतिशय तिखट प्रतिक्रिया दिली आहे. करोनावरील अमुल्य लसीच्या ( ) साठवणुकीसाठी सर्वात प्रभावी उपाय आणि कुशलतेचा उपयोग सरकारने केला आहे, असा दावा तेलंगण सरकारने केला आहे. पंतप्रधान मोदी आणि केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी लस वाया जाण्यासंदर्भात केलेला दावा तेलंगणचे आरोग्य संचालक डॉ. जी. श्रीनिवास यांनी फेटाळून लावला आहे. हा दावा पूर्णपणे चुकीचा आहे. आमच्या प्रशासनाकडून लस वाया जाण्याचे प्रमाण एक टक्क्याहूनही कमी आहे. केंद्र सरकारने १७ टक्के लस वाया जात असल्याचा दावा केला आहे. पण खरं तर राज्यात ०.७६ टक्केच लसीची डोस वाया जात आहेत. केंद्र सरकारने तयार केलेल्या पोर्टलच्या डेटा आणि संख्येनुसार राज्यात लसीचे डोस वाया जाण्याचे प्रमाण देशात सर्वात कमी आहे, असं श्रीनिवासन म्हणाले.

देशात करोनाची वाढती रुग्णसंख्या आणि लसीकरण मोहीमेसंदर्भात गेल्या आठवड्यात पंतप्रधान मोदी यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंद्वारे राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी संवाद साधला होता. यावेळी मोदींनी करोनावरील लसीचे डोस मोठ्या प्रमाणात वाया जाण्याचा मुद्दा उपस्थित केला होता. तेलंगण, आंध्र प्रदेश आणि उत्तर प्रदेशात १० टक्क्यांहून अधिक करोनावरील लसीचे डोस वाया म्हणजे फेकण्यात जात असल्याचं मोदी म्हणाले होते. राज्यांनी समीक्षा करून फेकण्यात जाणारे लसीच्या डोसचे प्रमाण कमी केले पाहिजे, असं आवाहन मोदींनी केलं होतं. त्यानंतर लेगचच केंद्रीय आरोग्य सचिव यांनी माध्यमांशी संवाद साधला होता. तेलंगणमध्ये करोनावरील लसीचे डोस वाया जाण्याचे प्रमाण हे १७ टक्के आहे तर राष्ट्रीय सरासरी ६.५ टक्के आहे, असं भूषण म्हणाले होते.

करोनाविरोधी लढाईत आज आपण जिथे आहोत आणि त्यातून जो आत्मविश्वास मिळवला आहे त्यामुळे हलगर्जीपणा वाढू नये. आपल्याला जनतेला घाबरवायचं नाहीए आणि चिंतामुक्तही करायचं आहे. आता ‘टेस्ट, ट्रॅक आणि ट्रीट’ या मंत्रावर गंभीरतेने काम केले पाहिजे, असं पंतप्रधान मोदी त्यावेळी म्हणाले होते.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here