सध्या आमचा अनिल देशमुख यांची चौकशी करण्याबाबतचा निर्णयच झालेला नाही, तर मग असा विषय येतो कुठे?, असा सवाल बाळासाहेब थोरात यांनी उपस्थित केला आहे. आम्ही या विषयात इतके पुढे गेलोलोच नाही. एक पत्र आणि लगेच त्या मंत्र्याची चौकशी असे कसे होऊ शकते बरे?, असा सवाल थोरात यांनी उपस्थित केला आहे.
क्लिक करा आणि वाचा-
भारतीय जनता पक्ष हा शेवटी विरोधी पक्ष आहे. सत्ता नसल्यामुळे सध्या हा पक्ष अस्वस्थ आहे. त्यांचा सतत काही ना काही प्रयत्न सुरू असतो. जी गोष्ट घडली त्यावरून वातावरण निर्माण करण्यासाठी ही संधी असल्याचे त्यांना वाटत आहे, असे थोरात म्हणाले. विरोधी पक्षाचा हा प्रयत्न केवळ सत्तेसाठी चाललेला आहे. काही प्रश्नांची उत्तरे मला देण्याची आवश्यकता नाही, मुख्यमंत्र्यांनी निर्णय घेतलेले आहेत, तेच माहिती देतील आणि ते योग्य आहे, असे थोरात यांनी सांगितले.
क्लिक करा आणि वाचा-
राज्यात कायदा आणि सुव्यवस्थेचा कोणताही प्रश्न निर्माण झालेला नाही. कारण युती सरकारच्या काळात फडणवीस मुख्यमंत्री असताना अनेक प्रश्न निर्माण होत होते, असे थोरातांनी म्हटले. परमबीर सिंग यांचे पत्र देखील दबावातून आलेले दिसत आहे. त्यामुळे त्यांच्या प्रतिक्रियेवर आम्ही बोललेच पाहिजे असे नाही. आम्ही तिन्ही पक्षांचे नेते अजून एकत्र बसलेलो नाही. या प्रकरणी आमची एकत्र चर्चा होईल. हे षडयंत्र रचले जात आहे, असे आम्हाला वाटते, असेही शेवटी थोरात म्हणाले.
क्लिक करा आणि वाचा-
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times